घरमहाराष्ट्रयाकूब मेमन कबर सुशोभीकरण प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी भाजपाला केले सवाल, म्हणाले...

याकूब मेमन कबर सुशोभीकरण प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी भाजपाला केले सवाल, म्हणाले…

Subscribe

मुंबई – बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी याकूब मेमनला फाशी देऊन 7 वर्ष उलटली आहेत. यानंतर त्याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याकूब मेमनच्या मुंबईतील कबरीचे सुशोभिकरण झाल्याचा मुद्दा भाजपकडून उपस्थित करण्यात आल्यानंतर त्यावरून राजकीय आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुंबईत याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभिकरण झाल्याचा मुद्दा अपस्थित करत भाजपने शिवसेनेवर टीका केली होती. यानंतर आदित्य ठाकरेंनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना भाजपाला प्रतिप्रश्न केला आहे. निवडणुकांच्या आधी हे असे काही मुद्दे काढून राजकारण केले जात असल्याचेही ते म्हणाले.

शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंनी या मुद्द्यावरून भाजपाला काही सवाल केले आहेत. एक तर सणाच्या दिवसांमध्ये राजकारण ही एक घाणेरडी गोष्ट झाली आहे. याप्रकरणातली तथ्य लोकांसमोर यायला हवीत. आरोप करणे सोपे असते. पण खरे बोलणे कधीकधी कठीण असते. आज खरे बोलणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण –

पहिली गोष्ट म्हणजे त्या माणसाचे दफन का झाले? आपण त्याला अतिरेकी म्हणून फाशी दिली. ओसामा बिन लादेनचे समुद्रात दफन झाले. मग याचे एवढे मोठे दफन यांनी का केले? शिवाय दफन करताना एनओसी घेणे गरजेचे आहे. ती एनओसी कुठेही नाही. महत्त्वाचे म्हणजे ही ट्रस्ट खासगी आहे, महापालिकेचा त्याच्याशी काडीमात्र संबंध नाही, असे स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी दिले.

- Advertisement -

आपल्या देशात असा कायदा आहे की १८ महिन्यात मृतदेहाचे रोटेशन व्हायला हवे. कारण त्या मृतदेहाचे विघटन व्हायला लागते. हे का झालं नाही? असा सवालही आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.

काय आहे प्रकरण –

दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते. फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आली. ही जागा ‘बेरियल वक्फ बोर्डा’च्या अख्यत्यारीत येते. हा वाद समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी या ठिकाणी कारवाई केल्याचे वृत्त समोर आले आहे. या कबरीवरील एलईडी लाईट्स हटवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -