घरताज्या घडामोडीउद्योग, कृषी क्षेत्रांचा 'खोके' सरकारवरील विश्वास उडालाय, आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

उद्योग, कृषी क्षेत्रांचा ‘खोके’ सरकारवरील विश्वास उडालाय, आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

Subscribe

वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअरबस यांसारख्या प्रकल्पांनंतर आता सॅफ्रनसारखे प्रकल्प महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जात आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. दरम्यान, उद्योग, कृषी क्षेत्रांचा ‘खोके’ सरकारवरील विश्वास उडालाय, असं ट्वीट करत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत शिंदे सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कृषी आणि उद्योग या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांचा खोके सरकारवरील विश्वास उडाला आहे. गुंतवणूकदारांचा राजकीय स्थैर्यावरील विश्वास उडाला आहे. तसेच शेतकऱ्यांचा नैसर्गिक संकट काळात सरकार मदत करेल यावरून विश्वास उडाला आहे. राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि प्रशासनाचा पूर्ण ऱ्हास हे महाराष्ट्राचं अपयश आहे, असं ट्वीट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

- Advertisement -

एखादी कंपनी राज्याबाहेर जात असेल तर आपण समजू शकतो. मात्र, हे सातत्याने होत आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार हे चालवण्याच्या लायक नसल्याचे सिद्ध झाले असून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.

- Advertisement -

हेही वाचा : राज्यात मोठा प्रकल्प येईल असा लॉलीपॉप दाखवला जातोय, सॅफ्रन कंपनी गेल्यानंतर सुळेंची प्रतिक्रिया


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -