घरमहाराष्ट्रगद्दारांना कात्रजचा घाट दाखवणार - आदित्य ठाकरे

गद्दारांना कात्रजचा घाट दाखवणार – आदित्य ठाकरे

Subscribe

दिल्लीश्वर विचारत नाही त्यामुळं माझ्यानंतर हे लोक दौरे सुरु करत आहेत. हे दोन लोक फक्त खालच्या पातळीच्या राजकारणाचा विचार करतात. मी वयाचा भान ठेऊन बोलतोय, मला आक्रमकपणा दाखवायला लावू नका, असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला आहे

मुंबईः शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे यांच्या ‘शिवसंवाद’ यात्रेचा दुसरा टप्पा आज कात्रज धनकवडी इथल्या सभेने पूर्ण झाला. पुण्यातील कात्रज धनकवडीत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना थेट आव्हान देत हिम्मत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, जनतेचा कौल घ्या असं म्हटलंय. धनकवडी इथल्या ‘शिव संवाद’ मेळाव्याला शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती . यावेळी बोलताना तेहतीसाव्या दिवशीही तिसरा माणूस सापडला नाही, या दोघांमध्ये खरा मुख्यमंत्री कोण हेही त्यांना कळलेलं नाही . त्यामुळे हे सरकार कोसळणारच असं प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना केलं .

पूर परिस्थितीमध्ये आपल दोन लोकांचं सरकार नेहमी दिल्लीला जात आहे. दिल्लीश्वर विचारत नाही त्यामुळं माझ्यानंतर हे लोक दौरे सुरु करत आहेत. हे दोन लोक फक्त खालच्या पातळीच्या राजकारणाचा विचार करतात. मी वयाचा भान ठेऊन बोलतोय, मला आक्रमकपणा दाखवायला लावू नका, असा इशाराही आदित्य ठाकरेंनी दिला आहे.

- Advertisement -

12 खासदार आणि 40 आमदारांचा राजकीय जन्म आम्ही घडवून आणला , यांच्यावर गरजेपेक्षा आणि लायकीपेक्षा जास्त विश्वास टाकला ही आमची चूक झाली . बंड करण्यासाठी ताकत हिम्मत लागते , या गद्दारांनी जे केलं ते गद्दारीच केली . यांना उठाव करायचा असता तर दुसऱ्या राज्यात पळून गेले नसते , आसाममध्ये लाखो लोक बेघर झाले , हे खरे शिवसैनिक असते तर पुरात उतरून मदत केली असती , मात्र हे मजा मारत राहिले , हे स्वतःला शिवसैनिक समजतात , हे शिवसैनिक असू शकत नाही . हिम्मत असेल तर राजीनामे द्या आणि जनतेचा कौल घ्या असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आव्हान दिलंय.


हेही वाचाः भडकाऊ भाषण करून चितावणी देणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार, एकनाथ शिंदेंचा इशारा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -