घरमहाराष्ट्रमराठा विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकला खुल्या गटातून प्रवेश

मराठा विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकला खुल्या गटातून प्रवेश

Subscribe

पॉलिटेक्निकला अर्ज केलेल्या मराठा विद्यार्थ्यांना आपला प्रवर्ग बदलण्याच्या सूचना तंत्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना ५ डिसेंबरपर्यंत आपला प्रवर्ग बदलायचा आहे.

अकरावी व आयटीआय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीबीएसई प्रवर्ग स्थगित केल्याने मराठा विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून अर्ज भरावे लागले आहेत. त्यापाठोपाठ आता पॉलिटेक्निकला अर्ज केलेल्या मराठा विद्यार्थ्यांना आपला प्रवर्ग बदलण्याच्या सूचना तंत्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना ५ डिसेंबरपर्यंत आपला प्रवर्ग बदलायचा आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकासाठी राज्य सरकारने दिलेल्या एसईबीसी प्रवर्गाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे यंदाची अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रिया महिनाभरापासून रखडलेल्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता राज्य सरकारने एसईबीसी प्रवर्गाला स्थगिती देत विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रथम अकरावी, त्यानंतर आयटीआय व आता पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला अर्ज केलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना खुल्या गटातून अर्ज करावा लागणार आहे. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ९ सप्टेंबर २०२० पूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी सीईबीसी प्रवर्गांतर्गत अर्ज भरले आहेत. अशा विद्यार्थ्यांना त्यांचा प्रवर्ग बदलण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून संधी देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी खुल्या किंवा खुल्या दुर्बल घटक या प्रवर्गातंर्गत अर्ज रुपांतरित करायचा आहे. उमेदवारांनी त्यांच्या लॉगिनमध्ये जाऊन ५ डिसेंबरपर्यंत आपला प्रवर्ग बदलायचा आहे. जे विद्यार्थी आपला प्रवर्ग बदलणार नाहीत. त्यांना खुल्या प्रवर्गातूनच प्रवेश देण्यात येईल, असे तंत्रशिक्षण सचालनालयाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

- Advertisement -

ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र बंधनकारक

ओपन ईडब्ल्यूएस प्रवर्ग निश्चित करणार्‍या विद्यार्थ्यांना केंद्रीभूत फेरीअंतर्गत इडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश मिळाल्यास त्यांना ईडब्ल्यूएस संवर्गाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. प्रमाणपत्र सादर न केल्यास अशा उमेदवारांचा प्रवेश संस्थेद्वारे निश्चित करण्यात येणार नाही व विद्यार्थ्यांना आपला दावा गमवावा लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -