घरमहाराष्ट्रनाशिक१२ जीव गेल्यावर 'त्या' चौकात बसवले गतिरोधक, रंबल, सूचना फलक

१२ जीव गेल्यावर ‘त्या’ चौकात बसवले गतिरोधक, रंबल, सूचना फलक

Subscribe

नाशिक : शनिवारी (दी.८) औरंगाबाद रोड येथील मिर्ची हॉटेल चौकात झालेल्या भीषण अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर झालेल्या जिल्हा नियोजन मंडळा समिती बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांनीही प्रशासनाला रस्त्यांच्या सुरक्षेबाबत उपायोजना करण्यासाठी १५ दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. यानंतर आता प्रशासनाने तत्परता दाखवत कामाला सुरवात केली आहे. अपघात झालेल्या मिर्ची  हॉटेल चौकात विविध उपायोजना केल्या जात आहेत. बुधवारी (दी.१२) या चौकात सूचना फलक, गतिरोधक आणि रंबल स्ट्रीप बसवण्यात आले आहेत. त्याचसोबत फॅचिंग करण्याच्याही कामाला सुरवात करण्यात आली आहे. दरम्यान, फॅचिंग करण्यासाठी अडथळा ठरत असलेल्या अनधिकृत अतिक्रमण धारकांना नोटिस बजावण्यात आली असून त्यांना ८ दिवसाची मुदत देण्यात आली आहे.

शनिवारी (दी.८) झालेल्या भीषण अपघातात १२ निष्पाप प्रवाश्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघाताची गंभीर दखल घेत, घटनास्थळी भेट दिली. त्यासोबत अपघातात जखमी झालेल्या प्रवाश्यांचीही जिल्हा शासकीय रुग्णालयत भेट घेतली होती. याचवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी अपघाताची सखोल चौकशी करून उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री दादा भुसे यांनीही प्रशासनाला तात्काळ रस्ते सुरक्षेच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी १५ दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. यानंतर प्रशासनकडून तत्परतेने कामाला सुरवात झाल्याचं दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने शहरातील रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉटवर गतिरोधक, सूचना फलक, रंबल्स, फॅचिंग आदि उपायोजना केल्या जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -