घरताज्या घडामोडी''महाराष्ट्राची सुटका झाली''; कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांसह विरोधकांकडून टीकेची झोड

”महाराष्ट्राची सुटका झाली”; कोश्यारींच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांसह विरोधकांकडून टीकेची झोड

Subscribe

रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा (Resignation) मंजूर केला आहे.

रमेश बैस (Ramesh Bais) यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा (Resignation) मंजूर केला आहे. भगत कोश्यारी यांचा राजीनामा स्विकारल्यानंतर विरोधकांनी महाराष्ट्राला न्याय मिळाल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी नवे राज्यपाल रमेश बैस यांचेही अभिनंदन केले. (After bhagat singh Koshyari resignation opposition voices that Maharashtra got justice)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

- Advertisement -

माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली. अतिशय चांगला निर्णय जो आधीच घ्यायला हवा होता. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती कधीही राज्यपाल झाली नव्हाती ती आपण पाहीली.केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी हा बदल केला ही समाधानकारक बाब आहे. जेजे संविधानाच्या विरोधात झालं असेल त्या सगळ्याची चौकशी झाली पाहीजे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

- Advertisement -

भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून आधी बदनामी करून घेतली. आता त्यांचे काम झाले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेली वक्तव्ये आम्ही कधीही विसरू शकणार आहे. त्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली आहे. त्यांची खुर्ची सत्तेत राहण्यासाठी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घेतला आहे. यामुळे राज्याच्या जनतेची ताकत समजली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेचा अपमान केला. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. चुकीच काम केलं तर ते सत्ताधारी आणि विरोधक यांचे कान धरू शकतात. तर आत्ता येणारे नवे राज्यपाल हे माझे मित्र आहेत. ते चांगल काम करतील अशी अपेक्षा आहे. ते यांच्यासोबत खासदार राहिले आहेत. ते चांगलं काम करत असतील तर काँग्रेस त्यांना नक्की साथ देईल. येत्या काही दिवसांत समजेल ते कसं काम करतात.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत

नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावं. राजभवनाचं भाजप मुख्यालय बनवू नये. राज्यात विरोधी पक्षाचा आवाज आहे. घटनेनुसार आहे. तो ऐकायला हवा. सरकारच घटनाबाह्य आहे. याचं भान राज्यपालांनी ठेवलं पाहिजे. ज्या सरकार विरोधात कोर्टात सुनावणी आहे, त्याचे निर्णय आणि शिफारशी किती आणि कश्या मान्य करायच्या याचं भान राज्यपालांना ठेवावं लागेल. नाही तर पुन्हा संघर्ष होईल, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

राज्याला नवे राज्यपाल मिळाले. रमेश बैस त्यांच्या नावात बैस आहे की बायस आहे हे माहीत नाही. त्यांनी घटनेनुसार काम केलं तर त्यांचं स्वागत होईल, असं सांगतानाच मी बैस यांना ओळखतो. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात ते मंत्री होते. ते सुस्वभावी आहेत. नवीन राज्यपालांचे स्वागत करतो, असं राऊत म्हणाले.

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे

मुंबई काँग्रेस

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे


हेही वाचा – राष्ट्रपतींनी देशातील 12 राज्यांचे राज्यपाल बदलले, कोणाच्या खाद्यांवर कोणत्या राज्याचा भार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -