घरअर्थजगतझोमॅटोने २२५ शहरांतून व्यवसाय गुंडाळला, काय आहे कारण?

झोमॅटोने २२५ शहरांतून व्यवसाय गुंडाळला, काय आहे कारण?

Subscribe

Zomato Wraps Business in small Cities | झोमॅटोच्या ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहित ७५ टक्क्यांनी महसूल वाढून १९४८ कोटी झाला होता. यामध्ये कंपनीचा तोटा ५ पटीने वाढून ३४६ कोटी रुपये झाला होता.

Zomato Wraps Business in small Cities | नवी दिल्ली – फूड डिलिव्हरी (Food Delivery App) करणाऱ्या झोमॅटोने (Zomato) मोठा निर्णय घेतला आहे. लहान शहरांतील (Small Cities) व्यवसाय झोमॅटोने गुंडाळला आहे. आतापर्यंत २२५ लहान शहरांतील सेवा झोमॅटोने बंद केली असून कंपनीच्या डिसेंबर तिमाहीच्या (December Quarter) कमाईच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

जानेवारी महिन्यांत आम्ही जवळपास २२५ लहान शहरांतून बाहेर पडलो आहोत, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. या शहरांतून जवळपास एकूण व्यवसायाच्या ०.३ टक्केच व्यवसाय होत होता. एकीकडे झोमॅटोने एक हजार शहरांत व्यवसाय विस्तार केल्यानंतर २२५ लहान शहरांतून कंपनी बाहेर पडली आहे. या शहरांतील नफ्यातून कंपनीच्या नफ्यात फारसा फरक पडत नव्हता असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अदानी ग्रुपला आणखी एक झटका; सिमेंट कंपनी अदानी विल्मरच्या गोदामांवर छापे

झोमॅटोच्या ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहित ७५ टक्क्यांनी महसूल वाढून १९४८ कोटी झाला होता. यामध्ये कंपनीचा तोटा ५ पटीने वाढून ३४६ कोटी रुपये झाला होता. तर, ३१ डिसेंबर रोजी संपलेल्या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी कंपनीच्या महसुलात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, एकीकडे २२५ शहरांमधून बाहेर पडल्यानंतर झोमॅटोच्या शेअर्समध्येही घसरण झाली. शुक्रवारी सकाळी बीएसईवर कंपनीचा शेअर १.४७ टक्क्यांनी घसरून ५३.६० रुपयांवर आला होता.

- Advertisement -

फूड डिलिव्हरीसाठी भारतात सर्वाधिक झोमॅटोचा (Zomato) वापर केला जातो. आपल्या कमाईत वाढ होण्याकरता कंपनीने गोल्ड सबस्क्रिप्शन (Gold Subscription) उपलब्ध केले आहे. महत्त्वाचं म्हणजे २२५ शहरातील एक्जिटची माहिती तेव्हा समोर आली आहे जेव्हा या कंपनीने ८०० लोकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, तोट्यामुळे या शहरातील व्यवसाय बंद झाला नसून नफा वाढवण्याकरता येथील व्यवसाय गुंडाळला असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा RBI चा सामान्यांना ‘जोर का झटका’, रेपो दरात वाढ, EMI पुन्हा वाढणार, 6.50 टक्के नवा दर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -