घरCORONA UPDATEशरद पवारांच्या मुलाखतीनंतर संजय राऊत जाणून घेणार मुख्यमंत्री ठाकरेंची 'दिल की बात'

शरद पवारांच्या मुलाखतीनंतर संजय राऊत जाणून घेणार मुख्यमंत्री ठाकरेंची ‘दिल की बात’

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतल्यानंतर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत सामना साठी घेतली. सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे मिळाली. उद्धव ठाकरे यांची दिल की बात राजकारण ढवळून काढेल. करोना पासून राम मंदिरा पर्यंत मुख्यमंत्री ठाकरे दणक्यात बोलले.. मुलाखत २५, २६ जुलै रोजी वाचता प,हाता येईल.”, अशी पोस्ट संजय राऊत यांनी फेसबुकवर टाकली आहे.

 

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत सामना साठी घेतली. सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरे मिळाली…उद्धव ठाकरे…

Posted by Sanjay Raut on Monday, July 20, 2020

‘एक शरद, सगळे गारद’, या टॅगलाईनने खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी सामना दैनिकासाठी मुलाखत घेतली होती. त्यामध्ये कोरोनाची परिस्थिती, महाविकास आघाडी सरकारचे कामकाज, राष्ट्रीय प्रश्न, विशेषतः चीनच्या प्रश्नावर पवार यांनी आपली मते मांडली होती. ही मुलाखत तीन भागांमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांची मुलाखत दोन भागामध्ये घेण्यात आलेली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -