घरमहाराष्ट्रवंशाच्या दिव्याच्या हव्यासापोटी मातेचा बळी

वंशाच्या दिव्याच्या हव्यासापोटी मातेचा बळी

Subscribe

दहाव्या अपत्यावेळी महिलेचा मृत्यू

वंशाला दिवा पाहिजे म्हणून ९ मुली झाल्यानंतर दहाव्यांदा गरोदर राहिलेल्या एका महिलेचा तीच्या दहाव्या अपत्यासह मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात घडली. नऊ मुलीनंतर झालेले दहावे अपत्य मुलगा झाला होता. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केले मात्र तेही दगावले. या दुर्दैवी घटनेमुळे माजलगाव तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मीराबाई रामेश्वर एकहांडे (३८)असे या दुर्दैवी मातेचे नाव आहे. मूळच्या परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे राहणारे रामेश्वर एकहांडे हे पोटापाण्यासाठी पत्नीसह बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे आले होते. माजलगावात पानटपरी चालवणार्‍या रामेश्वर यांची पत्नी मीराबाई ही पहिल्यांदा गरोदर राहिली व तीला मुलगी झाली होती. दुसरा मुलगा होईल म्हणून पुन्हा गरोदर राहिली तेव्हाही तिला मुलगीच झाली. वंशाला दिवा पाहिजे म्हणून ती तिसर्‍यांदा गरोदर राहिली मात्र पुन्हा मुलगीच झाली. मुलाची वाट पहाता पाहता मिरबाईला एका पाठोपाठ एक अशा सात मुलीच झाल्या. त्यानंतर मीराबाईने दोन वेळा गर्भपात केला त्याही वेळा दोन्ही मुलीच होत्या.

- Advertisement -

वंशाला दिवा पाहिजे म्हणून अखेर नऊ मुलीनंतर दहाव्यांदा गर्भवती राहिलेल्या मिराबाईला गुरुवारी माजलगाव येथील ग्रामीण शासकीय हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी मीराबाई बाळंत झाली व तीला झालेले दहावे अपत्य मुलगा झाला. मात्र दोघांची प्रकृती अचानक चिंताजनक होती. डॉक्टरांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघेही वाचू शकले नाहीत.आईच्या पाठोपाठ मुलगाही दगावला. माजलगाव पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. मीराबाईने सर्व बाळंतपण सुखरूप पार पडले. मात्र या वेळी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तिचा आणि बाळाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप जवळचे नातेवाईक प्रभाकर शेटे यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -