घरताज्या घडामोडीCorona : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, ५ व्यक्तींना कोरोनाची लागण

Corona : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घरात कोरोनाचा शिरकाव, ५ व्यक्तींना कोरोनाची लागण

Subscribe

बारामतीमध्ये गोविंद बागेतील पवार कुटुंबीयांच्या दिवाळी कार्यक्रमला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार गैरहजर होते. अजित पवार यांना कोरोनाची भीती असल्याची माहिती राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. अजित पवारांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला असून त्यांच्या दोन ड्रायव्हर आणि ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अजित पवार यांनी कोरोना चाचणी केली असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. पवार कुटुंबीयांच्या दिवाळी भेट कार्यक्रमाला हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि घेतल्या तसेच कोरोना संकट जावो आणि आपली दैनंदिन स्थिती पूर्वपदावर येवो असे शरद पवार म्हणाले.

पुण्यातील बारामतीमध्ये गोविंद बागेत पवार कुटुंबीयांचा दिवाळी भेट कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला संपूर्ण पवार कुटुंबीय आले होते परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली. अजित पवार कार्यक्रमाला आले नाही असा प्रश्न राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना केला. यावर त्यांना कोरोनाचा धोका असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. पवार म्हणाले अजित पवार यांना कोरोना झाला असल्याची भीती आहे. अजित पवारांच्या घरातील ३ कर्मचारी आणि २ ड्रायव्हर्सना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अजित पवार यांचा कोरोना अहवाल अजून आला नाही त्यामुळे त्याची प्रतीक्षा आहे. दिवाळी भेट कार्यक्रमाला जास्त गर्दी होणार असल्यामुळे त्यांना घरीच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

- Advertisement -

दिवाळी भेट कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि कोरोना नियमांचे पालन करुन झाला असल्याचे शरद पवार म्हणाले. या कार्यक्रमाला बाहेरुन लोकं येणार होते. यामुळे सगळ्यांच्या आरोग्याचा विचार करुन अजित पवार यांना घरीच राहण्यास सांगितले. कोरोनाचा धोका पत्करुन चालणार नसल्यामुळे अजित पवार कार्यक्रमाला आले नाही असे शरद पवार म्हणाले आहेत.

दिवाळी भेट कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची गर्दी

पवार कुटुंबीयांच्या दिवाळी भेट कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यंदाच्या दिवाळीमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने सर्व कोरोनाची खबरदारी घेऊन हजारो कार्यकर्त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि घेतल्या असल्याचे शरद पवार म्हणाले. तसेच कोरोना संकट लवकर टळेल आणि आपली सर्व व्यवहार पुर्वपदावर येतील अशी खात्री असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : mumbai vaccination: मुंबईत पुढील ३ दिवस लसीकरणाला ब्रेक, सोमवारपासून होणार सुरुवात

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -