घरताज्या घडामोडीPDCC Bank Election : आम्ही संपूर्ण जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला -...

PDCC Bank Election : आम्ही संपूर्ण जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला – उपमुख्यमंत्री अजित पवार

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज(रविवार) बारामती दौऱ्यावर आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्यासाठी त्यांनी मतदानाचा हक्क देखील बजावला आहे. आम्ही संपूर्ण जागा बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने आम्हाला त्यामध्ये यश आलं नाही. लोकशाहीमध्ये काही उमेदवार उभे राहतात. त्याचप्रमाणे ते उभे आहेत. आम्ही आमच्या निवडीनुसार आणि विचारधारेनुसार लोकं निवडूण देण्याचा प्रयत्न करत आहोत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले की, हवेली आणि पुणे, पिंपरी-चिंचवड यांचा विचार करता सर्वात जास्त मतदान दुसऱ्या क्रमाकांवर बारामतीचं आहे. अ,ब,क,ड आणि ई अशा स्वरूपात एकूण सातशे मतं आहेत. गेल्या ३० वर्षांपासून बँक आम्ही चांगल्या प्रकारे चालवत आहोत. त्यामुळे यावेळी सुद्धा लोकांनी आम्हाला सहकार्य करावं अशी आमची विनंती आहे, असं पवार म्हणाले.

- Advertisement -

बँकेबाबत भाजपकडून अनेक तक्रारी

या बँकेबाबत भाजपकडून अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावेळी पवार म्हणाले की, बिनविरोध जागा मिळण्यामध्ये आम्हाला खरं यश आलं. मात्र, आता शिरूर आणि मुळशीसाठी निवडणूक होती. हवेलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे. कारण तिथे दोन्हीही आमच्याच विचारांची लोकं आहेत.

निवडणुकीमध्ये कमीच लोकांना मतदानाचा अधिकारी

दोन महिलांसाठी क आणि ड वर्ग अशा निवडणूका होत आहेत. यामध्ये काही लोकांनी जातीयवाद करण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही लोकं इतर गोष्टींचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आम्ही सर्व मिळून बँक व्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न करत आहोत. शून्य टक्के व्याजाने ५ लाखापर्यंत कर्ज शेतकऱ्यांना देतो. दरम्यान, या निवडणुकीमध्ये कमीच लोकांना मतदानाचा अधिकारी असतो. त्यामुळे आता मतदान झाल्यानंतरच निकाल समोर येईल.

- Advertisement -

राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली दुसरी लाट नियंत्रणात आली. तेव्हापासून आम्ही आढावा घेत होतो. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत होती, यासाठी आम्ही आरोग्य विभाग, शिक्षण विभागासह सर्वांना सतर्कतेचं आवाहन केलं होतं. तसेच व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन बेड्स वाढवण्यासाठीही आम्ही सांगितलं. पुणे जिल्हाचा विचार करता, जिल्ह्यात ऑक्सिजन प्लान्ट उभे करण्यात आले आहेत.

दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून या बँकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बँकेतून झाली होती. त्यामुळे आता पुणे जिल्हा बँक ताब्यात ठेवण्यासाठी अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज बारामती दौरा, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी करणार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -