घरताज्या घडामोडीNawab Malik vs NCB : एनसीबीच्या बॅकडेटेड सह्यांचा फर्जीवाडा नवाब मलिकांकडून उघड

Nawab Malik vs NCB : एनसीबीच्या बॅकडेटेड सह्यांचा फर्जीवाडा नवाब मलिकांकडून उघड

Subscribe

अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या आणखी एक फर्जीवाडा खुला केला आहे. एनसीबीच्या पंचांच्या माध्यमातून खोट्या सह्या, खोटी प्रकरणे ही चर्चेच आली असतानाच एक संभाषण समोर आणत मोठी खळबळ उडवून दिली आहे. एनसीबीने जुनी प्रकरणे दुरूस्त करण्यासाठी जे पंच बनवले होते, त्यांनाच फोन करून जुन्या तारखेनुसार पंचनामा सुधारण्यासाठीचा प्रयत्न केला गेल्याचे संभाषण नवाब मलिकांनी प्रसार माध्यमांसमोर मांडले. एनसीबीच्या प्रकरणातील एक पंच आणि एनसीबी अधिकारी तसेच समीर वानखेडे यांच्यातील संभाषण नवाब मलिकांनी यावेळी पुरावा म्हणून मांडले.

काय आहे रेकॉर्डेड कॉल ?

एनसीबीचीचा मॅडी नावाचा पंच आणि किरण बाबू नावाचा एनसीबीचा अधिकारी यांच्यातील ही सही आहे. या संभाषणात एनसीबी अधिकारी किरण बाबू हा पंच मॅडीला बॅकडेटला पंचनाम्यात सही करा असे सांगतो आहे. जून महिन्यातील एका प्रकरणात ही सही करण्यासाठी सांगितले जात आहे. त्यामध्ये पंच घाबरतोय आणि तयार नाही असे असतानाही एनसीबीचे अधिकारी त्याच्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. तसेच समीर वानखेडे यांच्यासोबतही या पंचाने संभाषण साधले असता, त्यांनीही सही करायला जायला सांगितल्याचे हे संभाषण आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षात अनेक खोटी प्रकरणे एनसीबीने केली. त्यामध्ये खोट्या सह्या घेण्यापासून फिल्म सेलिब्रिटींकडून कोट्यावधीची वसुली केली गेली. तसेच बॅकडेटेड सह्या करण्याचाही प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे. त्याचाच भाग म्हणून नवाब मलिक यांनी पंच आणि अधिकारी यांच्यातील संभाषण मांडले. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचा दावा त्यांनी केला. मी जेव्हा वानखेडेंविरोधात बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी कोर्टात मानहानीचा दावा केला. पण कोर्टात बाजू मांडताना एनसीबी किंवा केंद्रीय यंत्रणांबाबत आवाज उचलण्याचा मुद्दा मी मांडलेला आहे. मी तपास यंत्रणांच्या गैर कारभारावर बोलतच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डीजी एनसीबीवर काय कारवाई करणार ? समीर वानखेडेवर कारवाई करणार का ? असाही सवाल त्यांनी केला.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -