घरमहाराष्ट्रआमदार फुटण्यापासून रोखण्याचे शिवसेनेसमोर आव्हान

आमदार फुटण्यापासून रोखण्याचे शिवसेनेसमोर आव्हान

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी भाजपला दिलेल्या पाठिंब्याने शनिवारी महाराष्ट्रात खळबळ उडाली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटल्याने शिवसेनेचे सत्तास्थापनाचे स्वप्न भंगले असले तरी 30 नोव्हेंबरला भाजपला सत्तास्थापनेसाठी संख्याबळ दाखवावे लागणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपले आमदार फुटण्यापासून रोखण्याचे आव्हान शिवसेनेसमोर निर्माण झाले आहे.

अजित पवार यांच्या पाठिंब्याने भाजपने शनिवारी पहाटे तातडीने सत्ता स्थापन केली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषदेत घेण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानवर जसा सर्जिकल स्ट्राईक झाला, तसा महाराष्ट्रावर हा फर्जिकल स्ट्राईक झाला आहे.

- Advertisement -

देशात रात्रीस खेळ चालेचा भाग सुरू आहे. असा आरोप भाजपवर केला. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींने वेगाने सुरू झाल्या. भाजपने सरकार स्थापन केले असली तरी त्यांना संख्याबळ दाखवणे गरजेचे असल्याने आता मोठ्या प्रमाणात आमदार फोडण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. आमदार फुटण्याची शक्यता लक्षात घेऊन शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना अंधेरीमधील ललित हॉटेलमध्ये हलवले. आमदारांना ललितमध्ये हलवल्यानंतर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी स्वत: हॉटेलमध्ये जाऊन आमदारांची भेट घेत त्यांना शिवसेनेचेच सरकार येणार असा विश्वास दिला. मात्र त्याचवेळी त्यांनी आपले आमदार फुटू नयेत यासाठीची सर्व काळजी घेत या आमदारांचा मुक्काम ३० नोव्हेंबरपर्यंत मुक्काम ललित हॉटेलमध्ये कायम केला आहे. शनिवारी महा विकास आघाडीची घोषणा होऊन सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता असल्याने उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व आमदारांना फक्त आधारकार्ड घेऊन बोलवले होते. परंतु अजित पवारांच्या बंडामुळे शिवसेनेच्या आमदारांच्या नजरकैदेत वाढ झाली आहे.

सत्ता स्थापनेसाठी भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकते हे लक्षात घेऊन शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांवर करडी नजर ठेवली आहे. त्याचप्रमाणे अजित पवार यांच्यासोबत भाजपकडे गेलेल्या आमदारांपैकी दोन आमदारांना शोधून आणण्याची महत्त्वाची भूमिकाही शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे व मिलिंद नार्वेकर यांनी बजावली. फुटीची लागण होऊ नये यासाठी शिवसेनेकडून सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -