घरताज्या घडामोडीAlibag : अलिबागचे नाव बदलणार? विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; वाचा नेमका प्रस्ताव...

Alibag : अलिबागचे नाव बदलणार? विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; वाचा नेमका प्रस्ताव काय?

Subscribe

अलिबाग म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे प्रतीगोवा. गोव्यातील समुद्र किनाऱ्यांप्रमाणेचे अलिबागच्याही समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी असतो. त्यामुळे अलिबागला मिनीगोवा म्हणून ओळखले जाते. पण आता याच अलिबागकरांसाठी आणि अलिबागला जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता अलिबागचे नाव बदलून मायनाक नगरी होण्याची शक्यता आहे.

अलिबाग : अलिबाग म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे प्रतीगोवा. गोव्यातील समुद्र किनाऱ्यांप्रमाणेचे अलिबागच्याही समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी असतो. त्यामुळे अलिबागला मिनीगोवा म्हणून ओळखले जाते. पण आता याच अलिबागकरांसाठी आणि अलिबागला जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता अलिबागचे नाव बदलून मायनाक नगरी होण्याची शक्यता आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी केली आहे. मात्र, राहुल नार्वेकरांच्या मागणीला आता अलिबागमधून विरोध होताना पाहायला मिळत आहे. (Alibag Assembly Speaker Rahul Narvekars Letter To CM Eknath Shinde To Change The Name Of Alibaug)

मिळालेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर, मुख्य सचिव प्रकाश कांबळी, सह सचिव वैभव तारी आणि प्रवक्ते शशांक पाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत ही मागणी केली होती. या शिष्ठमंडळाच्या मागणीची दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. त्यानुसार, ही मागणी अतिशय रास्त असून त्याची शासन स्तरावरून उचित दखल घेण्यात यावी आणि नामकरण, स्मारक उभारणी याद्वारे या मागणीची पूर्तता व्हावी, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Weather Update: राज्यात पुढील चार दिवस अवकाळी; ‘या’ भागांत वादळी पावसाचा अंदाज

परंतू, शिष्टमंडळाने केलेल्या या मागणीला अलिबाग मधूनच विरोध होत आहे. विशेष म्हणजे कान्होजी राजे आंग्रे यांच्या वंशजांनी यावर आक्षेप घेतला आहे. दरम्यान, “अलिबागच्या नावाला ऐतिहासिक महत्व आहे. त्यामुळे हे नाव बदलाची गरज नाही. हे नाव बदलायची कोणाची मागणी असेल तर, सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या नावाचा विचार प्राधान्याने व्हायला हवा. मायनाक भंडारी यांचे कर्तृत्व आहे, यात शंका नाही. म्हणून अलिबागला त्यांचे नावे देणे उचित होणार नाही. निवडणूकीच्या तोंडावर एखाद्या समाजाला खूष करण्यासाठी अशा मागण्या करणे चुकीचे आहे”, असे म्हणत आंग्रे घराण्याचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी अलिबागचे नाव बदलण्याच्या मागणीला विरोध केला.

- Advertisement -

राहुल नार्वेकरांच्या पत्रात काय?

अनेक आक्रमणांपासून स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी सागरी किल्ले आणि मराठा आरमाराने महत्वाची भूमिका बजावली होती. अलिबाग येथील खांदेरी-उंदेरी बंदरावरील किल्ला आणि तेथील मायनाक भंडारी यांचा पराक्रम, चिवट संघर्ष यापुढे इंग्रजांना ही माघार घ्यावी लागली होती. स्वराज्याचे आरमार आणि त्यासंदर्भातील इतिहास यातील मायनाक भंडारी यांच्या या पराक्रमाचा ऐतिहासिक संदर्भ घेता अलिबाग शहरासह तालुक्याचे ‘मायनाक नगरी’ असे नामकरण करण्यात यावे. तसेच, मायनाक भंडारी यांचे अलिबाग शहरात भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशा आशयाचे पत्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याचे समजते.


हेही वाचा – ELECTRICITY TARIFF HIKE : सामान्यांच्या मासिक खर्चात दोन शून्यांची वाढ केली, ठाकरे गटाची भाजपावर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -