घरताज्या घडामोडीलग्नात चांगल्या वस्तू, भांडी न दिल्याने विवाहितेचा छळ

लग्नात चांगल्या वस्तू, भांडी न दिल्याने विवाहितेचा छळ

Subscribe

लग्नात मानपान व चांगल्या वस्तू, भांडी न दिल्याने पती, सासू व सासर्‍याने विवाहितेचा छळ केल्याची घटना भाग्यश्री बंगला, मथुरा गार्डनसमोर, कामटवाडे येथे घडली. याप्रकरणी पीडित विवाहितेने अंबड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी पती कुणाल किरण जोशी (सर्वजण रा.भाग्यश्री बंगला, मथुरा गार्डनसमोर, कामटवाडे ), सासरे किरण गोविंद जोशी, सासू शिला किरण जोशी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, माहेरुन कार खरेदीसाठी एक लाख रुपये आणावेत, घरकाम नीट करता येत नाही, लग्नात मानपान ठेवला नाही, चांगल्या वस्तू, भांडी दिली नाही, या कारणावरुन विवाहितेचा पती, सासू व सासरे यांनी शारीरिक व मानसिक छळ केला. तिला मारहाण केली. सासरचा छळ असहाय्य झाल्याने विवाहितेने अंबड पोलीस ठाण्यात आपबिती सांगत तिघांविरुद्ध तक्रार दिली. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करत आहेत.

गोळे कॉलनीतून दुचाकी लंपास

दुचाकीमालकाच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना लक्ष्मीनगर, गोळे कॉलनी येथे घडली. याप्रकरणी विनय विश्वनाथ परांजपे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, विनय परांजपे यांणी दुचाकी (एमएच १५-व्ही-१४९१) गोळे कॉलनीत पार्क केली होती. त्यांच्या गैरहजेरीत चोरट्याने दुचाकी लंपास केली. ते पार्किंग ठिकाणी आले असता त्यांना दुचाकी लंपास झाल्याची दिसली. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक धात्रक करत आहेत.

- Advertisement -

टवाळखोरांनी केली एकास शिवीगाळ, मारहाण

भरस्त्यात धिंगाणा घालणार्‍या टवाळखोरांना बाजूला होण्यास सांगितल्याचा राग अनावर झाल्याने त्यांनी एकास शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना अंबड येथील अष्टविनायकनगर, रितापार्कच्या गेटसमोर घडली. याप्रकरणी दिनेश विजय हेडगे यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चौघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अक्षय चंद्रकांत ठाकरे असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय ठाकरे हा तीन मित्रांसह भरस्त्यात मोठमोठ्याने आरडाओरड करुन नाचत होता. त्यावेळी नितीन ढबाले हे दुचाकीवरुन जात होते. त्यांनी हॉर्न वाजवून चौघांना रस्त्यावरुन बाजूला होण्यास सांगितले असता राग अनावर झाल्याने त्यांनी ढबाले यांना शिवीगाळ व मारहाण केली. तुम्ही येथे कसे राहता, अशी चौघांनी त्यांना धमकी दिली. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक शेळके करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -