घरमहाराष्ट्रटोलवसुलीत होतोय 'झोल', विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

टोलवसुलीत होतोय ‘झोल’, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Subscribe

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टोलवसुलीच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत या टोल वसुलीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे सांगितले आहे. याबाबतचे पत्र दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेले आहे.

मुंबई : राज्यामध्ये सध्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राजकारण तापलेले आहे. रविवारी (ता. 27 ऑगस्ट) कोकणामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून खड्ड्यांच्या प्रश्नांसाठी ‘कोकण जागर यात्रा’ काढण्यात आलेली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या यात्रेचे नेतृत्व करत कोलाडमध्ये जनतेला संबोधित केले. ज्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. परंतु आता दुसरीकडे अंबादास दानवे यांनी रस्त्यांच्या संदर्भातील एका वेगळ्या विषयाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दानवे यांच्याकडून लक्ष वेधण्यात आलेल्या या प्रकरणामध्ये खूप मोठा झोल होत असल्याचे सांगितले त्यांनी सांगितले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टोलवसुलीच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत या टोल वसुलीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे सांगितले आहे. याबाबतचे पत्र दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेले आहे. (Ambadas Danve’s letter to CM Eknath Shinde regarding toll collection)

हेही वाचा – Jayant Patil : “दुष्काळ आपल्या दारी” म्हणत जयंत पाटील यांची सरकारवर सडकून टीका

- Advertisement -

टोलवसुलीच्या माध्यमातून राज्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार होत आहे. ज्यामुळे याबाबतची श्वेतपत्रिका काढून सामान्य जनतेसमोर या टोलवसुलीची वस्तूस्थिती मांडावी, अशी मागणी त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केलेली आहे. त्यामुळे मनसेने खड्ड्यांचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर आता अंबादास दानवे यांनी टोल वसुलीचा प्रश्न उपस्थित केल्याने सरकारकडून याबाबत नेमकी काय भूमिका घेण्यात येणार आहे? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. टोल वसुलीचा कालावधी तसेच टोल वसूलीतून मिळालेली रक्कम याबाबत राज्यातील सर्व टोल नाक्याबाबत श्वेतपत्रिका काढून याबाबतची वस्तुस्थिती राज्यातील जनतेसमोर आणावी, असे अंबादास दानवे यांनी या पत्राच्या माध्यामातून म्हटले आहे.

मुंबईत सुमारे 55 उड्डाणपुलाचा खर्च वसूल करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांनी MEP Infrastructure या कंपनीस सन 2010 पासून मुंबईच्या प्रवेश द्वाराजवळ टोलवसुली करण्यास परवानगी दिलेली आहे. तथापी, सदर उड्डाणपूलासाठी झालेल्या खर्चाची वसुली पूर्ण होवूनही सदर कंपनीद्वारे टोलवसुली सुरू आहे. त्याचा नाहक भुर्दंड राज्यातील सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे. याचप्रमाणे राज्यातील अनेक टोलसंदर्भात खर्च वसुली पूर्ण होऊन देखील गत काही वर्षापासून टोल वसूली सुरू आहे. टोलवसुलीची खरी आकडेवारी संबंधित कंपन्यांकडून लपविली जात आहे. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैर व्यवहार होत असल्याची बाब निदर्शनास आली असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. तर, उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता रस्ते, उड्डाणपूल यासाठी झालेला खर्च टोल वसुलीचा कालावधी तसेच टोलवसुलीतून मिळालेली रक्कम याबाबत राज्यातील सर्व टोल नाक्याबाबत श्वेतपत्रिका काढून याबाबतची वस्तुस्थिती राज्यातील जनतेसमोर आणावी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -