Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र डॉ. कार्तिकेयन आणि स्वामी ऋतवन भारती यांचा स्वामी कुवलयानंद योग पुरस्काराने गौरव

डॉ. कार्तिकेयन आणि स्वामी ऋतवन भारती यांचा स्वामी कुवलयानंद योग पुरस्काराने गौरव

Subscribe

मुंबई : सीबीआयचे माजी संचालक आणि मानवाधिकार आयोगाचे महासंचालक पद्मश्री डॉ. डी. आर. कार्तिकेयन तसेच स्वामी राम साधक ग्राम, ऋषिकेशचे आश्रमप्रमुख स्वामी ऋतवन भारती यांचा काल, सोमवारी स्वास्थ्य आणि आरोग्य-कल्याण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी जाहीर सत्कार करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत दोन्ही मान्यवरांना कैवल्यधाम स्वामी कुवलयानंद योग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा – Miss World 2023 : 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा मान भारताला; काश्मीरमध्ये होणार स्पर्धा

- Advertisement -

सुदृढ शरीर आणि उत्तम आरोग्य राखण्यासाठी कार्यरत असलेली कैवल्यधाम ही संस्था योग आणि सर्वांगीण आरोग्यासाठी एक प्रसिद्ध केंद्र आहे. कैवल्यधामच्या भव्य सभागृहात सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. कैवल्यधामसारख्या संस्थेने आरोग्य, निरोगीपणा आणि आध्यात्मिक सुसंवाद वाढविण्यात आघाडीवर असलेल्या व्यक्तींचा सन्मान करणे ही एक आनंददायी बाब असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी सांगितले.

पुरस्कार विजेत्यांनी असाधारण समर्पण आणि मानवाच्या कल्याणार्थ आपले जीवन खर्ची घातले आहे. पद्मश्री डॉ. डी. आर. कार्तिकेयन हे गेल्या 60 वर्षांहून अधिक काळ अनुकरणीय अशी समाज सेवा केलेले एक दूरदर्शी नेते आहेत. ते एक नामांकित लेखक, आंतरधर्म समरसतेचे प्रवर्तक आणि समाजातील वंचित गटाचे पुरस्कर्ते आहेत. आतापर्यंत स्वामी कुवलयानंद योग पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. डॉ. कार्तिकेयन यांचे जीवन समर्पण, करुणा आणि समाजोन्मुख सेवाभाव दर्शवते.

- Advertisement -

हेही वाचा – उद्या दिसणार चंद्राचे निळे रूप, खगोलप्रेमींना पाहता येणार बिग मून

स्वामी ऋतवन भारती हे यौगिक ज्ञान आणि ध्यानाचे दीपस्तंभ असून, त्यांनी आपल्या जीवनाचा 30 वर्षांहून अधिक काळ भारतीय तत्वज्ञानाच्या शिकवणींचा प्रचार व प्रसार करण्यासाठी समर्पित केला आहे. या कार्याद्वारे ते गंगेसारख्या पवित्रतेचा सर्वत्र प्रसार करीत आले आहेत. स्वामी राम आणि स्वामी वेद भारती यांचे ते शिष्य असून वैदिक परंपरांना मूर्त रूप देत ते आध्यात्मिक आणि आधुनिक जगाला अगदी सहजगत्या जोडतात.

कैवल्यधाम ही संस्था योग ज्ञानाचा दिवा असून योगाभ्यासाद्वारे जनमानसाच्या आरोग्य- कल्याणाचे उद्दिष्ट ठेवून कार्यरत आहे. अशाच सर्वांगीण आरोग्य साधू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी गेली अनेक दशके ही संस्था मार्गदर्शक ठरली आहे. ज्यांनी आपले जीवन, आरोग्य, निरोगीपणा आणि आध्यात्मिक वाढीसाठी समर्पित केले आहे, अशा व्यक्तींचे कौतुक करण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा संस्थेने सातत्याने प्रयत्न केला आहे.

- Advertisment -