घरताज्या घडामोडीकेंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या जागी 'हे' मंत्री करणार नाशिक दौरा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या जागी ‘हे’ मंत्री करणार नाशिक दौरा

Subscribe

उद्याच्या नाशिक दौऱ्याबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसीय कार्यक्रमांचं नियोजन पूर्ण झाले होता. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा अचानक रद्द झाला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांचा उद्याचा नाशिक दौरा (nashik tour) रद्द झाला आहे. अमित शहांच्या ऐवजी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय (Union Minister of State for Home Affairs Nityananda Rai) हे नाशिक दौरा करणार असल्याची माहिती मिळते. तसेच, नाशिकमधील आणि इतर नियोजित कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केद्राच्या नव्या अग्निपथ योजनेमुळे देशभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शहांचा उद्याचा नाशिक दौरा रद्द झाल्याचे बोलले जात आहे. (amit shah nashik tour cancel nityanand rai will be present for yog din in nashik)

मिळालेल्या माहितीनुसार, उद्याच्या नाशिक दौऱ्याबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्या दोन दिवसीय कार्यक्रमांचं नियोजन पूर्ण झाले होता. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. अग्निपथ योजनेवरून देशात वातावरण तापल्याने दौरा रद्द झाल्याचे समजते. अमित शाह हे राष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने २१ जून रोजी नाशिक दौऱ्यावर येणार होते.

- Advertisement -

अग्निपथ योजना

सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची घोषणा केली. या घोषणेनुसार केंद्र सरकार तरुणांना चार वर्ष भारतीय सैन्यात काम करण्याची संधी देणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या या योजनेला देशभरातून प्रचंड विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले असून, रेल्वे गाड्याही जाळल्या आहेत. मात्र तरीही अद्याप केंद्र सरकारने ही योजना मागे घेणार नसल्याचे म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर; ठाणे हायवेवर रस्ता रोको

केंद्र आणि राज्य सरकार यांच्यासह अग्निवीरांना सवलत देण्यासाठी हवाई दलही सरसावले आहे. त्यानुसार, चार वर्षांच्या सेवेदरम्यान अग्निवीरांना हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळणार आहेत. याबाबत वायुसेनेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, पगार, हार्डशिप भत्ता, गणवेश भत्ता, कॅन्टीन सुविधा आणि वैद्यकीय सुविधा मिळणार आहे. या सुविधा नियमित सैनिकाला मिळतात. त्याशिवाय, अग्निवीरांना सेवा कालावधीत प्रवास भत्ताही मिळेल. याशिवाय त्यांना वर्षातून ३० दिवसांची रजा मिळणार आहे. त्यांच्यासाठी वैद्यकीय रजेची व्यवस्था वेगळी आहे.

हेही वाचा – ‘अग्निपथ’ च्या निषेधार्थ रेल्वे गाड्या जाळल्या, एक रेल्वे बनते ‘इतक्या’ कोटींना

अग्निवीरांना सीएसडी कॅन्टीनची सुविधाही मिळणार आहे. सेवेदरम्यान दुर्दैवाने अग्निवीरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला विमा संरक्षण मिळणार आहे. याअंतर्गत त्यांच्या कुटुंबाला सुमारे एक कोटी रुपये मिळणार आहेत.


हेही वाचा – मविआला पुन्हा धक्का! सर्वोच्च न्यायालयाने नवाब-देशमुखांना मतदानाचा अधिकार नाकारला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -