घरताज्या घडामोडीवाद बच्चू कडूंसोबत, परंतु, राणांची उद्धव ठाकरेंवर टीका; वाचा नेमके काय घडलं ?

वाद बच्चू कडूंसोबत, परंतु, राणांची उद्धव ठाकरेंवर टीका; वाचा नेमके काय घडलं ?

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर सोमवारी सकाळी आमदार रवी राणा यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी बोलताना रवी राणा यांनी मी बोललेले सर्व शब्द मागे घेतो व दिलगिरी व्यक्त करतो असे म्हटले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर सोमवारी सकाळी आमदार रवी राणा यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी बोलताना रवी राणा यांनी मी बोललेले सर्व शब्द मागे घेतो व दिलगिरी व्यक्त करतो असे म्हटले. तसेच, त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. “महाराष्ट्रातील निलंबित प्रश्न उद्धव ठाकरे पुर्ण करू शकले नाही, ते सर्व प्रश्न हे सरकार जलत गतीने करत आहे”; अशा शब्दांत रवी राणा यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

“आमच्या या वादापेक्षा महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची उन्नती आणि राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी मजबूत सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपामध्ये महाराष्ट्रात उभे आहे. महाराष्ट्रात जे मागील दोन वर्षात प्रश्न निलंबित राहिलेत, जे उद्धव ठाकरे पुर्ण करू शकलेले नाही. ते सर्व प्रश्न हे सरकार जलद गतीने मार्गी लावत आहे”, अशा शब्दांत रवी राणा यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

- Advertisement -

“तीन महिन्यांमध्ये ज्या गतीने सरकारला पुढे आणले. शेतकरी असो, शेतमजूर असो, किंवा कामगार असो किंवा सर्वसामान्यांचे प्रश्न असो प्रत्येक प्रश्नाला या सरकारने तोडगा काढून पुढे नेण्याचे काम केले आहे”, असेही रवी राणा यांनी म्हटले.

दरम्यान, रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यावादात सांगोल्याचे, शिंदेगटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनीही रविवारी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. “सांगोला तालुक्यात यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा दौरा केला आहे. सांगोला तालुक्यात उद्धव ठाकरे आले. म्हणून काही फरक पडणार नाही. गेली चाळीस वर्षे गणपतराव देशमुख आणि शहाजी पाटील यांचे सांगोला तालुक्यातील घराघरात आपुलकीचे आणि प्रेमाचे नाते आहे. उद्धव ठाकरे सांगोला तालुक्यात आल्याने काही फायदा होणार नाही सांगोला तालुका शेतकरी कामगारांचा पक्षाचा आहे”, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – बच्चू कडू आणि मी एकत्रच आहोत, मी माझे शब्द मागे घेतो; रवी राणांकडून दिलगिरी व्यक्त

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -