घरमहाराष्ट्रभाजपाने बोलताना संयम बाळगावा, आनंद अडसुळांनी बानवकुळेंना खडसावले

भाजपाने बोलताना संयम बाळगावा, आनंद अडसुळांनी बानवकुळेंना खडसावले

Subscribe

मुंबई – अमरावतीचा पुढचा खासदार आणि बडनेऱ्याचा आमदार भाजपाच असेल, असं वक्तव्य भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या मतदारसंघात आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात बोलत होते. यावरून आनंद अडसूळ यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा समाचार घेतला आहे. राज्यात युती टिकवायची असेल तर भाजपने संयम ठेवून बोलावे, असं आनंद अडसूळ म्हणाले.

“राज्यात युती टिकवायची असेल तर भाजपने संयम ठेवून बोलावे. अमरावती बुलढाणा हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे, त्यामुळे आमदार आणि खासदार भाजपचा म्हणणं चुकीचं आहे. आम्ही सोबत आहोत याचं भान चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठेवावं,” असं आनंदराव अडसूळ म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही आनंदराव अडसूळ यांनी सांगितलं.

- Advertisement -

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून शिवसेनेच्या आमदारांना आव्हान केलं जायचं. पुढच्या निवडणुकीत आमचेच आमदार-खासदार निवडून येणार असं काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सांगितलं जायतं. याच मुद्द्यावरून शिंदे गटाने शिवसेनेसोबत फारकत घेतली. दरम्यान, आता भाजपाकडूनही तीच रणनीती आखली जातेय. त्यामुळे शिवसेना आणि भाजपामध्येही वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. येत्या काळात भाजपच्या नेत्यांकडून पुन्हा अशी वक्तव्ये आली तर शिवसेना काय भूमिका घेईल हे पाहावं लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -