घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly Budget Session 2022 : एसटीचे शाळेचे मार्ग प्राधान्याने निश्चित करणार,...

Maharashtra Assembly Budget Session 2022 : एसटीचे शाळेचे मार्ग प्राधान्याने निश्चित करणार, परिवहन मंत्र्यांची विधान परिषदेत माहिती

Subscribe

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचे तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच सर्व अधिकार्‍यांची बैठक घेऊन उपलब्ध बसेसच्या माध्यमातून मार्ग निश्चिती करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधान परिषदेत दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी तसेच एसटी सेवा पूर्ववत करण्यासाठी समितीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यासाठी तयारीही परब यांनी दाखवली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यात एसटी बंद असल्यामुळे राज्यातील जनतेचे हाल होत असल्याचे विधान परिषदेत सांगितले. त्यामुळे या प्रकरणात तोडगा काढण्यासाठी त्यांनी मागणी केली. या विषयावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांची तसेच जेष्ठ सदस्यांची समिती स्थापन करण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या सूचनेवर समिती स्थापन करण्यासाठी सरकारची तयारी असल्याचे परब यांनी सांगितले.

- Advertisement -

एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी मी सातत्याने चर्चा करत आहे. त्यामुळे निलंबन मागे घेण्यात येईल या आश्वासनाचा पुनरूच्चार परब यांनी केला. निलंबन मागे घेतल्यावर कारवाईचे पत्र एसटी कर्मचार्‍यांच्या असंतोषाला खतपाणी घालत असल्याचे त्यांनी सांगितले. सदाभाऊ खोत यांनी सभागृहात मांडलेले पत्र हे खोट्या सहीचे आणि बनावट असल्याचाही परब यांनी खुलासा केला.

विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके यांनी विधान परिषदेत भंडारा जिल्ह्य़ातील एसटीची सेवा पूर्ववत करण्यासाठीचा प्रश्न मांडला होता. या शालेय विद्यार्थ्यांना एसटीच्या संपाचा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले. या बससेवा सुरू करण्यासाठी एसटीच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत रूट रिअलायमेंट करण्यात येतील असे उत्तर परिवहन मंत्र्यांनी दिले. भंडारा जिल्ह्य़ात १५५० कर्मचार्‍यांपैकी १४३ कर्मचारी सेवेत परतले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाची आम्ही होळी केली, एसटी अहवालाविरोधात पडळकर आक्रमक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -