घरठाणेकल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अनुराग ठाकूरांचे आयुक्तांना खडेबोल

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे अनुराग ठाकूरांचे आयुक्तांना खडेबोल

Subscribe

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल आयुक्तांना खडेबोल सुनावले आहे. लोकसभा निवडणूक 2024च्या मतदारसंघ उभारणीसाठी अनुराग ठाकूर कल्याणमध्ये आले होते. परंतु त्यांना रस्त्यांमधल्या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे अनुराग ठाकूर यांनी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांना खडेबोल सुनावले आहे.

कल्याण-डोंबिवलीच्या स्मार्ट सिटीमध्ये समावेश असूनही शहरातले खड्डे, ठिकठिकाणी पडलेला कचरा पाहून अनुराग ठाकूर चांगलेच संतापले. रविवारपासून अनुराग ठाकूर कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांवर फिरून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. अनुराग ठाकूर यांनी महापालिकेच्या स्मार्ट सिटी कार्यालयालाही भेट दिली.

- Advertisement -

अनुराग ठाकूर यांची भर पावसात रॅली

अनुराग ठाकूर यांची भर पावसात अंबरनाथ शहरात निघालेल्या रॅलीत मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. अंबरनाथमध्ये आज केंद्रीय मंत्री ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात संपूर्ण शहरात रॅली काढली असून या रॅलीत मोठ्या प्रमाणत महिलांनी भाग घेतला होता. आज शिवाजी चौक येथून वडवली सेक्शन समेवत अंबरनाथच्या विविध भागात रॅली काढली कार्यकर्ते पावसात भिजत असल्याचे पाहून मंत्री अनुराग ठाकूर यांनी छत्री बाजूला सारून स्वतः कार्यकर्त्यांसोबत भिजणे पसंद केले.

- Advertisement -

स्थानिक नागरिकांच्या वतीने अनुराग ठाकूर यांचे स्वागत करण्यात आले होते. रॅली संपल्यानंतर ठाकूर यांनी स्वानंद हॉलमध्ये आयोजित महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतना पक्ष बळकटीसाठी विशेष सूचना दिल्या आहेत.  येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी जयत तयारी करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.


हेही वाचा : मागील पाच वर्षात ‘या’ राज्यात ७०० कोटींची वीजचोरी, नक्की काय आहे प्रकार


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -