घरक्रीडाICC महिला टी-20 क्रमवारी जाहीर; गोलंदाज रेणुका सिंह 13व्या, तर दीप्ती शर्मा...

ICC महिला टी-20 क्रमवारी जाहीर; गोलंदाज रेणुका सिंह 13व्या, तर दीप्ती शर्मा 7व्या स्थानी

Subscribe

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) नुकताच महिला टी-20 क्रमवारीका जाहीर केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंहने पाच स्थानांनी झेप घेतली आहे.त्यामुळे 13 व्या स्थानावर पोहचली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) नुकताच महिला टी-20 क्रमवारीका जाहीर केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंहने पाच स्थानांनी झेप घेतली आहे.त्यामुळे 13 व्या स्थानावर पोहचली आहे. तसेच, फिरकीपटू दीप्ती शर्माने आपले सातवे स्थान कायम राखले आहे. शिवाय, फलंदाजांच्या क्रमवारीत भारताची सलामीवीर स्मृति मानधना 710 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. (ICC WOMENS T20I RANKINGS INDIA RENUKA SINGH JUMPS TO 13TH AMONG BOWLERS)

सोफिया डंकले आणि अॅलिस कॅप्सी या इंग्लंडच्या फलंदाजांच्या क्रमवारीतही पहिल्या सामन्यानंतर सुधारणा झाली आहे. सोफियाने 44 चेंडूत नाबाद 61 धावा केल्याने 13 स्थानांनी झेप घेत 44व्या स्थानावर पोहोचली आहे, तर एलिसने 20 चेंडूत नाबाद 32 धावा केल्याने 12 स्थानांनी पुढे जात ती 52व्या स्थानावर आहे.

- Advertisement -

फ्रेया डेव्हिसला 9 स्थानांचा फायदा झाला असून ती गोलंदाजांच्या यादीत 59व्या स्थानावर पोहोचली आहे. भारताची विकेटकिपर फलंदाज रिचा घोष 4 स्थानांनी झेप घेऊन 75 व्या स्थानावर पोहचली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत भारताची सलामीवीर स्मृति मानधना 710 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर, शेफाली वर्मा 686 गुणांसह सहा आणि जेमिमा रोड्रिग्ज 624 गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.

चेस्टर ली स्ट्रीट येथे गेल्या आठवड्यात झालेल्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताला इंग्लंडविरुद्ध 9 विकेट्से पराभव स्वीकाराला लागला होता. पण या सामन्यात रेणुकाने दमदार गोलंदाजी केली. ज्याचा फायदा तिला आयसीसी क्रमवारीत झाला. रेणुकाचे 612 रेटिंग गुण आहेत. दीप्ती शर्मा ही आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीच्या टॉप-10 मध्ये एकमेव भारतीय आहे. तर, ती अष्टपैलूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

भारताविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी केल्यानंतर इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू सारा ग्लेन ही इंग्लंडचीच सोफी एक्लेस्टोनच्या जवळ पोहोचली आहे. सारा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली असून ही तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट रँकिंग आहे. ती सोफीपेक्षा फक्त 13 गुणांनी मागे आहे.


हेही वाचा – टी-20 विश्वचषकात भारतीय संघ खेळणार नव्या जर्सीत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -