घरमहाराष्ट्र११ वीसाठी यंदा ५ नवीन महाविद्यालयांना मान्यता

११ वीसाठी यंदा ५ नवीन महाविद्यालयांना मान्यता

Subscribe

११वी प्रवेशाच्या जागा जाहीर करण्यात शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून विलंब होत असला तरी यंदा ११वीसाठी ५ नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. ही पाचही महाविद्यालये स्वयंअर्थसहाय्य विनाअनुदानित असणार आहेत.
यंदा ११वी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये भिवंडी, वसई आणि पनवेल ग्रामीण या भागांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा या भागातील १७४ महाविद्यालयांचा समावेश झाला आहे. या कनिष्ठ महाविद्यालयांच्या जागांचीही भर पडली आहे.

त्यामुळे मुंबई, नवी मुंबई व ठाण्यातील विद्यार्थ्यांना आणखी महाविद्यालये उपलब्ध होतील. दरम्यान, ११वीसाठी मोठ्या प्रमाणात महाविद्यालये मान्यतेसाठी अर्ज करत असतात, मात्र मागील दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे संस्थाचालकांना बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे यंदा मान्यतेसाठी फारच कमी अर्ज शिक्षण उपनिरीक्षक कार्यालयाकडे आले आहेत. त्यातील ५ महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. ही पाचही महाविद्यालये स्वंयअर्थसहाय्यता विनाअनुदानित असणार आहेत.

- Advertisement -

त्यामुळे या ५ महाविद्यालयांच्या जागांचीही यामध्ये भर पडणार आहे. सध्या महाविद्यालयांची नोंदणी सुरू असून आतापर्यंत १०१० महाविद्यालयांपैकी ९८५ महाविद्यालयांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली असून त्यांच्या ३ लाख ६५ हजार ९१५ जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. उर्वरित महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्या महाविद्यालयांमधील जागांचीही भर पडणार आहे. जागा वाढत असल्या तरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहत असल्याने त्याचा परिणाम महाविद्यालयांवरही होत आहे.

नव्याने समाविष्ट भागातील महाविद्यालयांची संख्या
भिवंडी ग्रामीण २८
भिवंडी शहर ३३
पनवेल ग्रामीण १३
वसई तालुका १००
=एकूण १७४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -