घरमहाराष्ट्रपुणेBaramati Lok Sabha : बारामतीवरून महायुतीत वादाची ठिणगी, अमोल मिटकरी शिवतारेंना स्पष्टच...

Baramati Lok Sabha : बारामतीवरून महायुतीत वादाची ठिणगी, अमोल मिटकरी शिवतारेंना स्पष्टच म्हणाले…

Subscribe

मुंबई : शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे हे बारामतीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. आज विजय शिवतारे यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात दुहेरी नाही तर तिहेरी लढत पाहायला मिळणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. परंतु, विजय शिवतारे यांनी अजित पवारांविषयी केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) नेते संतापले आहेत. शिवतारे यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी समज द्यावी, असे त्यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. (Argument in Mahayuti over Baramati Lok Sabha issue, Amol Mitkari warns Vijay Shivtare)

हेही वाचा… Vijay Shivtare : बारामतीवर कोणाची मालकी नाही, मी लढणार म्हणजे लढणारच; शिवतारेंचा ठाम निश्चय

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटातील नेते विजय शिवतारे हे अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. त्याचमुळे काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी इशारा शिवतारेंना आणि शिवसेना शिंदे गटाला इशारा दिला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी विजय शिवतारे यांना इशारा दिला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, शिवतारे यांनी निवडणूक लढवायची की नाही, हा त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तसा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मात्र, महायुतीत राहून आमच्या वरिष्ठ नेत्याबद्दल अपशब्द वापरण्याचे जे काही सत्र सुरू केले आहे, त्याचा आम्ही विरोध करतो.

तसेच, विजय शिवतारे ज्या पद्धतीचे वक्तव्य करत आहेत, त्याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. ज्यानंतर शिवतारेंना मुख्यमंत्र्यांकडून समज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पण जर का ते पुन्हा अजित पवारांनी चुकीच्या पद्धतीने काही बोलले तर त्यांना याबाबतचे सडेतोड उत्तर देण्यात येईल आणि मुळात बारामतीच्या जनतेला माहिती आहे की मागील काही वर्षांमध्ये कोणी काम केले आहे आणि कोणी नाही केले ते. त्यामुळे शिवतारेंना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मात्र, याचा काही परिणाम बारामती लोकसभा उमेदवाराच्यावर पडणार नसल्याचेही मिटकरी यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. पण आता शिवतारेंनी स्वतःला आवर घालावा, असेही मिटकरी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -