घरक्राइमशहरात भरवस्तीत ऐन सायंकाळी सशस्त्र दरोडा, वृद्धाचा खून; शहर बनतय क्राईम कॅपिटल?

शहरात भरवस्तीत ऐन सायंकाळी सशस्त्र दरोडा, वृद्धाचा खून; शहर बनतय क्राईम कॅपिटल?

Subscribe

नाशिक : जिल्ह्यासह शहरात मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी कारवाया वाढल्या आहेत. त्यात चोरी आणि दरोड्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. यातच नाशिक शहराला हादरवून टाकणारी घटना आता समोर आली आहे. अंबड लिंकरोड भागातील एक्सलो पॉइंट याठिकाणी ऐन सायंकाळच्यावेळी सशस्त्र दरोड्याची घटना घडली आहे. या घटनेत एका वृद्धाचा खून दरोडेखोरांनी केला आहे.

शहरातील औद्योगिक क्षेत्र असलेल्या आणि सतत वर्दळ असलेल्या अंबड एमआयडीसी भागात अश्या पद्धतीने दरोड्याची आणि त्यात वृद्धाच्या खुनाची घटना घडल्याने एकूणच पोलिस यंत्रणेसाठी ही मोठी चिंताजनक बाब आहे. अंबड लिंकरोड भागातील एक्सलो पॉइंट भागातील कर्डिले कुटुंब वास्तव्याला आहे. त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी सगळे कुटुंबिय बाहेर गेले होते. मात्र, जगन्नाथ कर्डिले हे ६५ वर्षीय काही कारणास्तव घरीच थांबले. शुक्रवारी (दी.२५) सायंकाळी ते घरी एकटे असताना दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. आपल्या खोलीत असलेल्या कर्डिले यांना कोणीतरोई घरात प्रवेश केल्याचे समजल्यावर ते बाहेर आले. समोर अनोळखी लोक दिसताच त्यांनी आरडाओरड करण्यास सुरवात केली. त्यांच्या आरडाओरड करण्यामुळे आपली फजिती होईल या भीतीने दरोडेखोरांनी त्यांच्या जवळ असलेल्या तीक्ष्ण हत्याराने त्यांच्या डोक्यावर वार केला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान या दरोडयात कर्डिले यांच्या घरातील सुमारे सात लाख रुपयांची रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -