घरक्राइमश्रद्धाच्या हत्येनंतर आफताबच्या घरी आलेली 'ती' मुलगी नेमकी कोण? पोलिसांकडून तपास सुरु

श्रद्धाच्या हत्येनंतर आफताबच्या घरी आलेली ‘ती’ मुलगी नेमकी कोण? पोलिसांकडून तपास सुरु

Subscribe

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाची पॉलीग्राफी टेस्ट पूर्ण झाली आहे. आता फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटकीची (FSL) टीम त्याची तपासणी करणार आहे. मात्र गरज भासल्यास आफताबला शनिवारी चौकशीसाठी बोलवले जाणार आहे. तर सोमवारी आफताबची नार्को टेस्ट केली जाण्याची शक्यता आहे. ही टेस्ट सुमारे 3 तास चालणार आहे. दरम्यान आधीच्या पॉलीग्राफ टेस्टदरम्यान आफकाबने अनेक खुलासे केले आहेत. त्याचवेळी श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर आफताबने ज्या मुलीला घरी बोलावले होते, त्याचाही छडा लागला आहे.

श्रद्धाच्या हत्येनंतर आरोपी आफताबने नेमक्या कोणत्या मुलीला घरी बोलावले? तिचे नाव आणि इतर माहिती समोर आलेली नाही. मात्र ही तरुणी व्यवसायाने डॉक्टर असल्याचे सांगितले जात आहे. आफताबचे या तरुणीशी काय संबंध आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

- Advertisement -

आरोपी आफताब त्याच्या मोबाईलवर बंबल हे डेटिंग अॅप युज करायचा. याच डेटिंग अॅपमधून तो एका मुलीच्या संपर्कात आला होता, जिला त्याने आपल्या घरी बोलावले होते. पोलिसांनी त्या मुलीची ओळख पटवली आहे. ती पेशाने ही मुलगी डॉक्टर आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर आफताबने ते फ्रीजमध्ये ठेवले आणि त्यानंतर या मुलीला घरी बोलावले होते.

गुरुवारी पॉलीग्राफी चाचणीदरम्यान आफताबची 8 तास चौकशी करण्यात आली. मात्र त्याला सतत शिंका आणि खोकला येत असल्याने त्यांचे म्हणणे नोंदवताना अधिकाऱ्यांना अडचणी आल्या. त्यामुळे आज पुन्हा त्याची पॉलीग्राफ टेस्ट केली जाणार आहे. दरम्यान आरोपी आफताबची आज कोठडी संपणार असून त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.


26/11 मुंबईतील दहशतवादी हल्ल्याला 14 वर्ष पूर्ण

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -