घरCORONA UPDATEलष्कर प्रमुख आज काश्मीर दौऱ्यावर; पाकिस्तानला भरली धडकी

लष्कर प्रमुख आज काश्मीर दौऱ्यावर; पाकिस्तानला भरली धडकी

Subscribe

दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न ही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे आज काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीमेवर आतंकवादी हल्ले सुरू आहेत. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवरील हिरानगर आणि कटूआ सेक्टरमधील नागरिकांना लक्ष केले जात आहे. तसेच दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न ही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे आज काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सीमेवरील कारवाईचा ते आढावा घेणार आहेत, अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली.

दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये सीमेवर गोळीबार सुरू आहे. तसेच पाक सैन्याकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. याची दखल घेण्यासाठी लष्कर प्रमुख जनरल नरवणे हे आज श्रीनगरला जाणार आहेत. लष्कराच्या १५ कॉपर्सकडून सीमेवरील दहशतवाद्यांची घुसखोरी आणि काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात मोहिमा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख नरवणे हे लष्कराच्या १५ कॉपर्सला भेट देणार आहेत आणि एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेणार आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.

- Advertisement -

पाकच्या कुरघोडी सुरूच

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील नागरी वस्त्यांना लक्ष्य करून पाककडून गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा सुरूच आहे. मंगळवारी रात्रभर गोळीबार सुरूच होता. या गोळीबारात एकाच कुटुंबातील दोन जण जखमी झाले आहेत. जखमींत दहा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -