घरमहाराष्ट्र...तर मला अटक करून दाखवाच, किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान

…तर मला अटक करून दाखवाच, किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान

Subscribe

तो राजीव चहावाला आणि इथे ही कंपनी योगेंद्र चाळवाला जो परत आज चाळीतल्या कुठल्यातरी खोलीत, त्याचा रूम नंबर 17 बी दादाभाई चाळ, परळ आहे तिथे राहतोय. सगळ्यात मजेदार बाब अशी आहे की, संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर हे कोविड सेंटरसाठी स्वत: दोन बेनामींना पुढे घेऊन अर्ज करायचे, असा सनसनाटी आरोपही किरीट सोमय्यांनी केलाय.

मुंबईः मुख्यमंत्रिपदाची खुर्ची वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांचे 19 बंगले रातोरात गायब केले, असं म्हणत हिंमत असेल तर मला अटक करून दाखवा, असं खुल आव्हानच भाजप नेते किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय. किरीट सोमय्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

चहावाल्यानंतर आता चाळवाला समोर आलाय, आता योगेंद्र, संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर यांनी लाईफलाईन हेल्थकेअर सोबत आणखी एक बोगस कंपनी काढली होती. त्याचं नाव होतं इटर्नल हेल्थ केअर मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि दुसऱ्या कंपनीचं नाव लाईफलाईन हेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस होतं. त्यामध्ये तो राजीव चहावाला आणि इथे ही कंपनी योगेंद्र चाळवाला जो परत आज चाळीतल्या कुठल्या तरी खोलीत, त्याचा रूम नंबर 17 बी दादाभाई चाळ, परळ आहे, तिथे राहतोय. सगळ्यात मजेदार बाब अशी आहे की, संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर हे कोविड सेंटरसाठी स्वत: दोन बेनामींना पुढे घेऊन अर्ज करायचे, असा सनसनाटी आरोपही किरीट सोमय्यांनी केलाय.

- Advertisement -


मी पुराव्याशिवाय एकही शब्द बोलत नाही. यांनी केलेले घोटाळे याचा हिशेब चार्टर्ड अकाऊंटंट किरीट सोमय्या जनतेचा ऑडिटर बनून देणार आहेत. आता रश्मी ठाकरेंचे 19 बंगले? जानेवारी 2019 मध्ये रश्मी ठाकरे यांनी अर्ज केला, उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये त्याच्या टॅक्सेसचं पेमेंट केलं. सरपंच मिसाळ यांच्याकडे मी ज्यावेळी 2020 मध्ये गेलो होतो, त्यावेळी माझ्यावर भडकले होते. पैसे घेतायत तर त्यात तुझं काय? असं म्हणत मला त्यावेळी शिवीगाळ करण्यात आली, असंही किरीट सोमय्यांनी सांगितलंय.


हेही वाचाः पुढच्या आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -