घरक्रीडाRohit Sharma Test Captain: रोहित शर्मा कसोटी कर्णधार, उपकर्णधारपदी या खेळाडूची नियुक्ती

Rohit Sharma Test Captain: रोहित शर्मा कसोटी कर्णधार, उपकर्णधारपदी या खेळाडूची नियुक्ती

Subscribe

पहिल्या सामन्यात कोहली खेळला नाही तर त्याचा १०० वा सामना बंगळूरुमध्ये होण्याची शक्यता आहे. मालिकेतील दुसरा सामना १२ मार्च ते १६ मार्च दरम्यान बंगळूरुमध्ये होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली ९९ वा कसोटी सामना खेळला.

भारतीय क्रिकेट संघाला नवीन कर्णधार मिळाला आहे. सीनियर सिलेक्शन कमिटीचे चेयरमन आणि माजी क्रिकेटकर चेतन शर्मा यांनी भारतीय संघाचा कसोटी कर्णधार पदी रोहित शर्माची नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापासून संघाचे नेतृत्व करताना दिसेल. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तीन कसोटी सामने खेळल्यानंतर विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून हे पद रिक्त होते. यानंतर बऱ्याच खेळाडूंची नावे कसोटी कर्णधार पदाच्या शर्यतीमध्ये होते अखेर रोहित शर्माला कर्णधार करण्यात आले आहे. तसेच उपकर्णधारपदी वेगवान गोलंदाजाची नियुक्ती करण्यात आली आहे. रोहित शर्मा आता तनही फॉरमॅटचा कर्णधार झाला आहे.

दरम्यान निवडकर्ते चेनत शर्मा म्हणाले की, आपण सर्वच जाणतो की रोहित शर्मा कोणत्या प्रकारचा खेळाडू आहे. रोहित शर्मा अधिक काळापर्यंत संघाचे नेतृत्तव करेल अशी आमची आशा आहे. तो चांगला खेळत असून संघ त्याच्या नेतृत्वात सुरक्षित आहे. तसेच उपकर्णधारपदी वेगवानग गोलंदाज जसप्रीत बुमराची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंत नसणार आहे त्यामुळे बुमराहला संधी देण्यात आली आहे.

- Advertisement -

भारताच्या कसोटी संघात बदल करण्यात आला असून अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा यांना डच्चू मिळाला असल्याचे बीसीसीआयने दिलेल्या माहितीमध्ये समजतं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात विराट कोहलीसुद्धा खेळणार नाही आहे. पंतला ब्रेक दिल्यामुळे श्रीलंकाविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून इशान किशन यष्टी रक्षणाची जबाबदारी पार पाडेल.

- Advertisement -

दरम्यान, कोहलीला T20 मालिकेतून ब्रेक देण्यात आला आहे. परंतु त्याची १०० वी कसोटी मॅच खेळण्यासाठी कोहली पुन्हा येऊ शकतो. कोहलीचा १०० वा कसोटी सामना मोहालीमध्ये होण्याची शक्यता आहे. जर पहिल्या सामन्यात कोहली खेळला नाही तर त्याचा १०० वा सामना बंगळूरुमध्ये होण्याची शक्यता आहे. मालिकेतील दुसरा सामना १२ मार्च ते १६ मार्च दरम्यान बंगळूरुमध्ये होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली ९९ वा कसोटी सामना खेळला.


हेही वाचा : India vs West Indies : टी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीमचे नव्या रणनितीवर काम, ऋषभ पंतचा खुलासा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -