घरमहाराष्ट्रघरातील गॅस रिक्षात भरणाऱ्यांवर कारवाई

घरातील गॅस रिक्षात भरणाऱ्यांवर कारवाई

Subscribe

बेकायदेशीरपणे घरातील गॅस रिक्षात भरणाऱ्यांविरोधात सोलापूर येथे कारवाई करण्यात आली आहे. या दोन रिक्षाचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर येथे दोन रिक्षा चालकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. सोलापूर येथील जय मल्हार चौकाजवळ एका ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरमधून रिक्षात गॅस भरताना दोघांवर कारवाई करण्यात आली. पुरवठा निरीक्षक बालाजी नागटिळक यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. अक्षय अनिल रास्ते (२३) आणि रिक्षाचालक आकाश हनमंतु सातपुते (२४) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले?

जय मल्हार चौकाजवळ एका ठिकाणी दोन रिक्षाचालक घरातील गॅस रिक्षात भरत होते. त्यादरम्यान त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. घरातील गॅस वाहनात भरणे गुन्हा असताना देखील उघडपणे रस्त्यात घरातील गॅस भरल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अक्षय रास्ते (२३) आणि आकाश सातपुते (२४) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याजवळील वजनकाटा, गॅस सिलिंडर साहित्य, पैसे असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. जय मल्हार चौकात अक्षय हा बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलिंडर मधून रिक्षात गॅस भरून देत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस व पुरवठा निरीक्षक यांनी कारवाई करून दोघांविरोधात तक्रार दिली आहे. रिक्षाचालक आकाश हा आपल्या रिक्षामध्ये गॅस भरून घेत होता. त्यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -