घरमहाराष्ट्रAryan Khan Drugs Case : आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नाहीत, कोणताही कट...

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नाहीत, कोणताही कट रचलेला नाही – हायकोर्ट

Subscribe

क्रूझ पार्टी प्रकरणात आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, तसंच त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये कट कारस्थान करण्याचा हेतू असल्याचं आढळून आलेलं नाही, असं २८ ऑक्टोबरला दिलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशाच्या प्रतीमध्ये म्हटलं आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी २८ ऑक्टोबर २०२१ रोजी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचा या तिघांना जामीन मंजूर केला होता. या आदेशाची तपशीलवार प्रत आज उपलब्ध करण्यात आली. त्यांच्यावर NDPS कायद्याच्या कलम २०(b), कलम २७, २८, २९ आणि ३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला ३० ऑक्टोबर रोजी जामीन देण्यात आला होता. आर्यनच्या जामीन ऑर्डरमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. आर्यन खान प्रकरणातील व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीही नाही, असं या आदेशात म्हटलं गेलं आहे. तर आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. अरबाज खान आणि मूनमून धमेचा हिच्याकडे ड्रग्ज सापडले आहेत. हे सापडलेले ड्रग्ज हे कमर्शिअल प्रकारातील नसून केवळ त्या व्यक्तीच्या सेवनापुरते आहेत. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज आणि मूनमून यांनी ड्रग्ज विक्रीचं षडयंत्र रचलेलं दिसून येत नाही, अशी टिप्पणी मुंबई हायकोर्टानं जामीन आदेशात केली आहे. तसंच, व्हॉट्सअॅप चॅटमध्ये कोणताही कट रचलेलं दिसून येत नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, व्हॉट्सअप चॅटच्या आधारावर आर्यन खानची कोठडी वाढवण्यात आली होती. परंतु, हायकोर्टाने हे पुरावे पाहिल्यानंतर आर्यनच्या व्हॉट्सअप चॅटमध्ये आक्षेर घेण्यासारखं काहीही नाही आहे. तसंच, त्यामध्ये कोणत्याही कटाचा भाग असल्याचं स्पष्ट होत नसल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे.

आर्यनला २८ ऑक्टोबरला जामीन मिळाला होता. त्यानंतर २९ ऑक्टोबरला तो तुरुंगातून बाहेर आला होता. तब्बल २५ दिवसानंतर आर्यनची तुरुंगातून सुटका झाली होती. साक्षीदार फोडू नये, तपासात अडथळा आणू नये, परवानगी शिवाय शहराबाहेर जाऊ नये, प्रत्येक शुक्रवारी कोर्टात हजर राहावे आदी शर्तीवर त्याला जामीन देण्यात आला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -