Wednesday, February 24, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सत्तेत येताच राष्ट्रवादीच्या आर्थिक रसदीत वाढ

सत्तेत येताच राष्ट्रवादीच्या आर्थिक रसदीत वाढ

लोढा डेव्हलपर्सनेही दिले पाच कोटी

Related Story

- Advertisement -

राज्यात सत्तेत येताच राष्ट्रवादी काँग्रेसची गेलेली श्रीमंती पुन्हा आली आहे. पक्षाला मिळणार्‍या आर्थिक रसदीत वाढ झाली असून विशेष म्हणजे भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या मालकीच्या लोढा डेव्हलपर्स कंपनीकडून २०१९-२० या आर्थिक वर्षात राष्ट्रवादीला ५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. तसेच सीरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावाला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला 3 कोटींची देणगी दिली आहे. याशिवाय मागरपट्टा सिटी डेव्हल्पमेंट, कुमार प्रॉपर्टीज, पंचशील कार्पोरेट पार्क, कप्पा रिल्टर्स, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन, मॉडर्न रोड मेकर्स आणि पेगासस प्रॉपर्टीज, फिनोलेक्स इंड्रस्ट्रीज, एमक्युअर फार्मासिटिकल्स, धारीवाल इंडस्ट्री आणि डेम्पो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनेही राष्ट्रवादीला भरभरून देणग्या दिल्या आहेत.

याशिवाय मागरपट्टा सिटी डेव्हल्पमेंट, कुमार प्रॉपर्टीज, पंचशील कार्पोरेट पार्क, कप्पा रिल्टर्स, बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन, मॉडर्न रोड मेकर्स आणि पेगासस प्रॉपर्टीज, फिनोलेक्स इंड्रस्ट्रीज, एमक्युअर फार्मासिटिकल्स, धारीवाल इंडस्ट्री आणि डेम्पो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनेही राष्ट्रवादीला भरभरून देणग्या दिल्या आहेत. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये राष्ट्रवादीला 59.94 कोटींचा निधी मिळाला होता. गेल्या वर्षी हा निधी 12.05 कोटी रुपये होता. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे पक्षाच्या योगदानाचा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या लोढा डेव्हल्पर्सने राष्ट्रवादीला 5 कोटींचा निधी दिल्याची माहिती उघड झाली आहे. ‘द प्रिंट’ने या बाबतचे वृत्त दिले आहे. प्रत्येक वर्षी राजकीय पक्षांना त्यांना देणगी स्वरूपात मिळणार्‍या 20,000 रुपयांपेक्षा जास्त पैशाची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. त्यातून ही माहिती उजेडात आली आहे.

- Advertisement -

सत्तेबाहेर असताना राष्ट्रवादीला मदत नाही
यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. हे दोन्ही पक्ष राज्यात ऑक्टोबर 1999 ते ऑक्टोबर 2014 पर्यंत सत्तेत होते. त्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. शिवसेनेच्या मदतीने फडणवीस सत्तेत आले. 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या बाहेर असताना लोढा डेव्हल्पर्सने राष्ट्रवादीला कधीच देणगी दिली नाही. वास्तविक राष्ट्रवादीला 2014-15 मध्ये देणगी मिळाली होती. त्या वर्षी राष्ट्रवादीला 38,82 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. याशिवाय लोढा ग्रुपची मालकी असलेल्या पलावा डेव्हलपर्सने 2014-15मध्ये राष्ट्रवादीला 3 कोटींची देणगी दिली होती. त्यानंतर लोढा ग्रुप आणि त्यांच्या मालकीच्या इतर कंपन्यांनी राष्ट्रवादीला आर्थिक रसद पुरवली नाही.

महानगरपालिका निवडणुकीवेळी मदत  
2015-16 मध्ये निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेसने 71.38 लाख रुपये देणगी स्वरूपात जाहीर केले होते. 201७ मध्ये मुंबई, पुण्यासह दहा महापालिकांच्या निवडणुका होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीला 6.34 कोटी देणगीतून मिळाले होते. 2017-18 आणि 2018-19 मध्ये राष्ट्रवादीला क्रमश: 2.08 कोटी आणि 12.05 कोटी रुपये मिळाल्याची निवडणूक आयोगाकडे नोंद आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीला जो निधी मिळतो तो आम्ही घेतो. हा निधी आम्ही पारदर्शकपणे निवडणूक आयोगाला सादर केला आहे. त्याभोवती संशय निर्माण करण्याची गरज नाही.-नवाब मलिक,प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस.

मी कंपनीचे थेट व्यवहार पाहत नाही. तुम्हाला कंपनीच्याच व्यक्तीच्या संपर्कात राहून माहिती घ्यावी लागेल
-मंगलप्रभात लोढा,मुंबई, अध्यक्ष, भाजप.

- Advertisement -