घरताज्या घडामोडीदेव डॉक्टरांच्या रुपात आपल्या सोबत असल्याचे लोकं विसरलेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

देव डॉक्टरांच्या रुपात आपल्या सोबत असल्याचे लोकं विसरलेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आशा निवास धर्मशाळेच्या उद्घाटनाला उपस्थित होते.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षांपासून बंद असलेली राज्यातील मंदिरं अखेर सुरु करण्यात आली आहे. संकटात लोकं देवाला शोधत असतात परंतु देव डॉक्टरांच्या रुपात आपल्या सोबत असल्याचे लोकं विसरले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आशा निवास धर्मशाळेच्या उद्घाटन प्रसंगी व्हिसीद्वारे उपस्थित होते. आशा धर्मशाळेत येणारा रुग्ण हा हसत खेळत निरोगी होऊन घरी परतो अशी प्रार्थना मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे. कोरोना काळात डॉक्टरांनी केलेल्या कामाचेही मुख्यमंत्र्यांकडून कौतुक करण्यात आले आहे. सध्या राज्यात रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आशा निवास धर्मशाळेच्या उद्घाटनाला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, आशा हा शब्द फार महत्वाचा आहे. आसा नसेल तर आयुष्यात काळोख आहे. माणसाचं आयुष्यच संपत तिकडे, आयुष्य आशेवरच माणूस जगत असतो. कोरोनाच्या काळात मंदिरं बंद, प्रार्थना स्थळे बंद होती. संकट आल्यावर आपण म्हणतो देव आहे कुठे? परंतु देव डॉक्टरांच्या रुपात आपल्या सोबत आला असल्याचे लोकं विसरलेत. देव नेमका कोणत्या स्वरुपात, कुठे असतो? आपण देवाला ओळखू शकत नाही. परंतु देव आपल्यासोबतच डॉक्टरांच्या रुपात आहे याचा लोकांना विसर पडला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मुबईत राज्यभरातून रुग्ण, लोकं येत असतात त्यांना उपाचारादरम्यान घरी येणं-जाणं परवडत नाही. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक देखील असतात मग त्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी नातेवाईकांना फुटपाथवर झोपण्याची वेळ येते. रुग्णांनाही काही वेळी रुग्णालयात बेड मिळत नाही. सरकार म्हणून मी स्वतः बघत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या काळात आपल्याकडे बेडची संख्या ही हजारोंमध्ये होती. यामध्येच आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड होते. आता राज्यात एकूण बेडची संख्या ही ५ लाखांपेक्षा अधिक आहे. राज्य सरकार बेड उपलब्ध करु शकते परंतु यंत्र चालवण्यासाठी तज्ञ डॉक्टरांची गरज असते. ते राज्य सरकार तयार करु शकत नाही यामुळे डॉक्टरांची गरज आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आरोग्य मंदिराचे लोकार्पण करण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, श्रीमती सुधा मुर्ती या  महाराष्ट्राच्या कन्या आहेत, पण त्यांच्यातील “आई” आज आपल्याला पहायला मिळाली,  सुखी माणसाचा सदरा कुणालाच सापडत नाही, प्रत्येकाला नेहमी काही ना काही हवं असतं यास्थितीत श्रीमती मुर्ती यांची दातृत्वाची वृत्ती  विरळ आहे. हा खऱ्या अर्थाने लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे.  जेंव्हा कॉम्प्युटर किंवा कुठलेही सॉफ्टवेअर विकसित झाले नव्हते तेंव्हा  नारायण मूर्तींनी आपल्या उद्योगाचा विकास आणि विस्तार केला. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत तर हे करत असतांना आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना देखील त्यांनी जपली.

- Advertisement -

सहकार्याचे अनमोल हात

आपण आज मंदिरे खुली केली आहेत पण यापूर्वीही डॉक्टरांच्या रुपाने देव आपल्या आसपास, सोबत वावरत होते याकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की उपचारासाठी मुंबईत किंवा मोठ्या शहरात  कर्करोगाच्या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि नातेवाईकांना खर्च परवडत नाही मग ते मिळेल तिथे राहातात, त्यांच्यासाठी हा “आशा” निवास  खुप महत्वाचा आधार ठरणार आहे. शासन राज्यातील आरोग्य सेवा सक्षम करत आहेच त्यात  टाटा मेमोरियल सेंटर आणि इन्फोसिससारख्या संस्थांच्या सहकार्याच्या हाताने या कामाला अधिक बळकटी मिळते.  मुख्यमंत्र्यांनी याठिकाणी येणारा रुग्ण खडखडीत बरा होऊन सुखरूप घरी जावो अशी सदिच्छाही यावेळी व्यक्त केली.

अनुभवातून आलेला संदेश

सुधा मुर्ती यांची पुस्तके ही केवळ चाळता येत नाहीत तर ती लक्ष देऊन वाचावी लागतात, यात कुठलाही कल्पनाविलास नाही तर अनुभवातून आलेला संदेश आणि‍ विचार आहे, हे विचारधन तुम्ही वाटत आहात असेही मुख्यमंत्र्यांनी सुधा मुर्तींच्या पुस्तकावर आपली प्रतिक्रिया देतांना म्हटले.

आशा निवासामुळे गरीब रुग्णांना मदत – सुधा मूर्ती

नवी मुंबई-खारघर येथे टाटा मेमोरियल सेंटर येथे उभारण्यात आलेल्या आशा निवास धर्मशाळेमुळे शहरात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब जनतेला मदत होईल असे सांगून मूर्ती यांनी टाटा मेमोरियल सेंटरतर्फे देण्यात येत असलेल्या रुग्णसेवेचे कौतूक केले. इन्फोसिस फाऊंडेशन आणि कंपनी सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी पुढे येऊन काही करू शकत असल्याचा आनंद व्यक्त करतांना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रात उत्तम काम होत असल्याचेही सांगितले.


हेही वाचा : ‘कोरोनाचं सावट कायमचं जाऊ दे’: मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब घेतलं मुंबादेवीचं दर्शन


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -