घरमहाराष्ट्र'चोरी की है तो कबूल करना पडेगा'; अजित पवारांच्या निकटवर्तीयांवरील IT छाप्यानंतर...

‘चोरी की है तो कबूल करना पडेगा’; अजित पवारांच्या निकटवर्तीयांवरील IT छाप्यानंतर सोमय्यांची प्रतिक्रिया

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणी आणि निकटवर्तीयांच्या कारखान्यांवर आणि संचालकांच्या घरांवर आयकर विभागाने छापे टाकले. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना चोरी की है तो कबूल करना पडेगा, असं म्हणत अजित पवारांवर निशाणा साधला. तुम्ही पाप केलंय, तुम्ही घोटाळे केलेत तर तुम्ही कबूल करा, असं सोमय्या म्हणाले.

अजित पवार आणि माध्यमांमुळे आम्हाला कळालं की आयकर विभागाच्या धाडी सुरु आहेत. धाडी कशासंदर्भात सुरु आहेत ते अजित पवारच चांगंल सांगू शकतात. तुम्ही पाप केलंय, तुम्ही घोटाळे केलेत तर तुम्ही कबूल करा. अजित पवारच नाही तर महाराष्ट्र, देशातील कोणत्याही निर्दोष व्यक्तीला तपास यंत्रणांनी हैराण करु नये अशी आमची पण भूमिका आहे. अजून तर तपास सुरु आहे. काल मी जरंडेश्वरला जाऊन आलो. अजित पवार त्याआधी तिथे जाऊन आले. मग अजित पवार जरंडेश्वरचा खरा चालक-मालक कोण? अशी माझी त्या २७ हजार शेतकऱ्यांतर्फे विनंती आहे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

- Advertisement -

“जनतेने भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी पंतप्रधान मोदींना मत दिलं आहे. मोदी त्या दिशेने पुढे जात आहेत. पण ठाकरे सरकार भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र करत आहेत म्हणून ही कारवाई आहे. अजित पवार साखर कारखाने ढापले त्यासंदर्भात का बोलत नाही? जरंडेश्वरचा मालक कोण? पारनेरचे शेतकरी विचारत आहेत. जर एवढा चांगला कारखाना चालू शकोत तर तो आमच्या नावाने का नाही चालवला. चोरी की है तो कबूल करना पडेगा,” असं सोमय्या म्हणाले.

“१८ महिन्यात महाराष्ट्रात लूटमार, माफियागिरी ठाकरे पवारांनी सुरु केली. अजित पवार, उद्धव ठाकरे, शरद पवार घोटाळ्यासंदर्भात बोलत नाहीत. तुम्ही चोरी केली आहे, लबाडी केली आहे, घोटाळे केलेत. साखर कारखान्यांच्या तपासाचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. अजित पवार यांच्यात हिंमत असेल तर हाय कोर्टाच्या मुख्य न्यायाधिशासमोर जाऊन बोलायचं तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात. आहे का हिंमत? खालच्या पातळीवर राजकारण सुरु असल्याचं बोलतायत तर मुंबई हाय कोर्टात जाऊन मुख्यन्यायधिशांना विचारावं आपण अशी ऑर्डर का दिली?” असं आव्हान सोमय्या यांनी अजित पवार यांना दिलं.

- Advertisement -

हेही वाचा – माझ्याशी संबंध म्हणून यंत्रणांच्या धाडी हे खालच्या पातळीचं राजकारण – अजित पवार

माझ्या तीन बहिणींवर IT च्या धाडी का? अजित पवारांचा संतप्त सवाल


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -