घरताज्या घडामोडीगोव्यात शिवसेनेचे डिपॉझिट वाचलं तर राऊतांना चहा देईन, आशिष शेलारांची टीका

गोव्यात शिवसेनेचे डिपॉझिट वाचलं तर राऊतांना चहा देईन, आशिष शेलारांची टीका

Subscribe

उत्पल पर्रीकर यांच्या विषयात मी खूप काही वाचले असून त्यांनी पणजीतून अपक्ष निवडणूक लढवली तर शिवसेना आपला उमेदवार मागे घेईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

गोव्यातील निवडणुकीवरुन महाराष्ट्रातही नेत्यांमध्ये आरोप आणि प्रत्यारोप सुरु झाले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोव्यात गेले आहेत. शिवसेनेकडून खासदार संजय राऊतसुद्धा गोव्यात आहेत. राष्ट्रवादीचे नेते गेले आहेत. परंतु गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ आहे. त्यांनी आपले डिपॉझिट वाचवलं तर संजय राऊतांना चहा आणि जेवण देईन असी खोचक टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ असून शिवसेनेचे तिथे डिपॉझिट जरी वाचले तर मी संजय राऊत सांगतील तिथे मी त्यांना चहा आणि जेवण देईन, अशा शब्दांत भाजपचे नेते आशीष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना शुक्रवारी टोमणा मारला आहे.

- Advertisement -

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना विरुद्ध भाजप असे चित्र सध्या रंगलेले दिसत आहे. गोवा निवडणुकीसाठी शिवसेनेने ९ उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली असून यावेळी खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीवरून भाजपचे कान टोचतानाच त्यांनी भाजपच्या तिकीट वाटपाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले. भाजपने घराणेशाहीच्या नावाखाली उत्पल पर्रीकर यांचे तिकीट कापले. मात्र वाळपई, पर्ये, पणजीत, ताळगावमध्ये घराणेशाहीलाच वाव दिला, अशी टीका राऊतांनी केली आहे. या टीकेला शेलारांनी उत्तर दिले. गोव्यात शिवसेनेचा पराभव अटळ आहे. अशावेळी शिवसेनेने तिथे आपले डिपॉझिट जरी वाचवले तरी मी राऊत यांना ते म्हणतील तिथे चहा आणि जेवण देईन, असे शेलार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

दरम्यान, उत्पल पर्रीकर यांच्या विषयात मी खूप काही वाचले असून त्यांनी पणजीतून अपक्ष निवडणूक लढवली तर शिवसेना आपला उमेदवार मागे घेईल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.


हेही वाचा : Goa Election : उत्पल पर्रिकरांची पणजीतून अपक्ष लढण्याची घोषणा, भाजपला मोठा धक्का

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -