Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मुंबई महापालिकेकडून लोकांचा जीव टांगणीला लावण्याचं काम, आशिष शेलार यांचा आरोप

मुंबई महापालिकेकडून लोकांचा जीव टांगणीला लावण्याचं काम, आशिष शेलार यांचा आरोप

मुंबई महानगरपालिकेने धोक्याची सूचना दिली होती का? धोकादायक भींत आहे याची पाहणी केली होती का?

Related Story

- Advertisement -

मुंबईत मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचलं आहे. तर भांडूप, चेंबूर, विक्रोळीमध्ये घरांवर संरक्षण भींत कोसळल्यामुळे २५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी भाजप नेते आशिष शेलार यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आशिष शेलार यांनी शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधला आहे. मुंबई महानगरपालिका केवळ लोकांचा जीव टांगणीला लावण्याचं काम करत आहे. मुंबई महापालिकेने धोक्याची सूचना दिली होती का? तसेच पाण्याचा निचरा डोंगरावरुन होतोय का नाही याची पाहणी केली होती का? असाही सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे की, लोकं झोपेत असताना त्यांना आपला प्राण गमवावा लागला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. डोंगरावरुन येणारे पाणी आजुबाजूला जाऊ शकत नाही कारण तशी व्यवस्था नाही. याची शहानिशा जरुर करावी हा राजकारणाचा वेळ नसला तरी मुंबई महागरपालिका यामध्ये कमी पडली आहे. हे नाकारता येणार नाही. मुंबई महानगरपालिकेने धोक्याची सूचना दिली होती का? धोकादायक भींत आहे याची पाहणी केली होती का? पाण्याचा निचरा व्यवस्थित होतोय का याची पाहणी केली होती का? स्वतः पुर्व पाहणी न करत लोकांचा जीव टांगणीला लावण्याचं काम महानगरपालिका करतं आहे. मुंबई महानगरपालिकेला आपले हात स्वच्छ करता येणार नाही असे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या घटना घडतायत

- Advertisement -

मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा पुर्णपणे फेल्यूर ठरली आहे. काहीदिवसांपुर्वी पाऊस पडला तेव्हाच मागणी केली होती की, त्वरीत काळजी घेऊन मुंबईला तुंबई होण्यापासून वाचवा, अशा प्रकरणामध्ये अधिक लक्ष घालण्याची गरज असून तसं झालं नाही यामुळे अनेक लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. पाण्याखील घरं गेल्यानं त्यांना मदत झाली पाहिजे त्यांना मदत करता येईल परंतु गेलेले जीव कसे परत आणणार अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. आम्ही बोललो कि राजकारण करतो, असे म्हणाल, परंतु पावसाळा आला कि, असे हकनाक बळी अजून किती दिवस जाणार आहेत? प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या घटना घडतायत असा घणाघात प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

- Advertisement -