घरक्राइमरावसाहेब दानवेंच्या जावयाने केला जीवे मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

रावसाहेब दानवेंच्या जावयाने केला जीवे मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

Subscribe

खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रावसाहेब दानवेंचे जावई अडचणीत आले असून त्यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जावयाविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दानवेंचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली त्यांच्याविरोधात चतुरश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह अजून एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन आणि ईशा झा या दोघांविरोधात अमन चड्डा यांनी फिर्याद दिली आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमन चड्डा सोमवारी सकाळच्या सुमारास आई, वडिलांना दुचाकीवरुन ब्रेमन चौकाकडे घेऊन जात होते. त्याचवेळी हर्षवर्धन जाधव आणि ईशा झा हे रस्त्याच्या बाजूला एका कारमध्ये बसले होते. त्याच दरम्यान हर्षवर्धन जाधव यांनी कारचा दरवाजा उघडल्याने चड्डा यांच्या दुचाकीचा अपघात झाला.

- Advertisement -

याप्रकरणी चड्डा यांनी गाडीत बसलेल्या हर्षवर्धन जाधव आणि त्यांचा सहप्रवासी ईशा झा यांना जाब विचारला. त्यावर हर्षवर्धन जाधव आणि ईशा झा यांनी अमन चड्डा आणि त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चड्डा यांनी वडिलांच्या हृदयाचे ऑपरेशन झाल्याचं सांगितलं. मात्र, तरीही दोघांनी मारहाण करणं चालूच ठेवलं. यानंतर अमन चड्डा यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार चतुरश्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.


हेही वाचा – जन्मदात्या आईवर ११८ वेळा लेकाने केले सपासप वार, पोलिसांना म्हणाला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -