घरमहाराष्ट्र...और फिर रोशनी बिखर जाती है, नित्याचेच आरोप-प्रत्यारोप होत असताना संजय राऊतांचे...

…और फिर रोशनी बिखर जाती है, नित्याचेच आरोप-प्रत्यारोप होत असताना संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा यांच्या रडारवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आहेत. खासदार संजय राऊत यांच्या बेधडक वक्तव्यावरून ते कायम टीकेचे धनी होतात. पण त्यांनी आज, मंगळवारी सकाळी केलेल्या एक रीट्वीटमुळे एक वेगळीच चर्चा रंगली आहे. त्यांच्याबाबतीत आरोप-प्रत्यारोप तर नित्याचेच आहे, पण ही चर्चा हटकेच आहे.

उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांची दररोज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधतात. त्यात ते शिंदे गट आणि भाजपावर हल्लाबोल करतात. कालच (सोमवारी) त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. आपण केवळ ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्याच चौकशीची प्रकरणे घेतो, असे किरीट सोमय्या सांगत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

- Advertisement -

कधी-कधी बोलताना त्यांची जीभ घसरते आणि ते अपशब्दाचा वापर करतात. अलीकडेच सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवगर्जना यात्रेमध्ये संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल अपशब्द वापरला. ‘निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना त्यांची आहे, शिवसेना तुमच्या बापाची आहे का भो***?’ असे ते म्हणाले होते.

- Advertisement -

खासदार संजय राऊत यांनी, विधिमंडळाला थेट ‘चोरमंडळ’ म्हटले होते. त्यावरून विधानसभेत जोरदार गदारोळ झाला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून सर्वच सदस्य आक्रमक झाले होते. अखेर संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग दाखल झाला. त्याला त्यांनी उत्तर देतानाच आणखी खुलासा करण्यासाठी मुदतवाढ मागितली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी युनूस खान या व्यक्तीचे ट्वीट रीट्वीट केले आहे. उस्ताद विलायत खान आणि उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा एक व्हिडीओ आहे. ‘ये सिर्फ एक क्लिप नहीं है। रस—वर्षा है। उस्ताद विलायत खां और उस्ताद बिस्मिल्लाह खां जुगलबंदी करते हुए “मोहे पनघट पर” बजा रहे हैं। सितार और शहनाई की मधुर रस वर्षा में भीगते हुए आप कहीं खो जाते हैं। अचानक दोनों उस्तादों का मन गुनगुनाने का हो उठता है… और फिर रोशनी बिखर जाती है।’ असे कॅप्शन त्याला दिले आहे. त्यामुळे राजकारणातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना ‘पनघट’वरील या निवांतपणाची चर्चा रंगत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -