घरताज्या घडामोडीसातवीच्या विद्यार्थीनीला दाखवली पॉर्न क्लिप, शिक्षकाचे घृणास्पद कृत्य

सातवीच्या विद्यार्थीनीला दाखवली पॉर्न क्लिप, शिक्षकाचे घृणास्पद कृत्य

Subscribe

औरंगाबाद येथे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. सातवीच्या विद्यार्थीनीला एका शिक्षकानेच पॉर्न क्लिप दाखवल्यामुळे खळबळ उडाली आहे. पीडित विद्यार्थीनीने पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर सदर प्रकार उजेडात आला. यानंतर आता सिडको पोलीस स्थानकात शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थाचालक नराधम शिक्षकास वाचवत असल्याचा आरोप पालकांनी यावेळी केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद शहरातील सिडको परिसरातील एका शाळेत हा प्रकार तीन ते चार आठवड्यांपूर्वी घडला होता. या प्रकारानंतर सदर विद्यार्थीनी तणावात होती. मात्र पालकांनी तिला विश्वासात घेऊन याबद्दल विचारल्यानंतर तिने पालकांना आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. तीन दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार नोंदविण्यात आली होती.

- Advertisement -

आरोपी शिक्षकाचे निलंबन करण्यात यावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेवर दबाव आणला होता. तसेच मुख्याध्यापकाला घेऊन पोलीस स्टेशनही गाठले होते. शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी होत असतानाही संस्थेने केवळ शिक्षकाला एका सत्रातून उचलून दुसऱ्या सत्रात टाकले. त्यामुळे पालकांचा संताप वाढला होता. आता गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर शिक्षक पसार झालेला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -