वन्यजीव तस्करीतील ९ जणांचा जामीन फेटाळला

उर्वरित दहा जणांच्या अर्जावर शनिवारी सुनावणी; वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली माहिती

वन्यजीव तस्करी प्रकरणी सर्वच संशयितांचा जामीन फेटाळला
श्रीधर गायधनी : नाशिकरोड
वन्यजीव तस्करीत वनविभागाने ताब्यात घेतलेल्या १९ संशयितांपैकी ९ जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असून शनिवारी (दि.२०) रोजी १० जणांची सुनावणी न्यायालयात होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
येवला तालुक्यातील सत्यगाव येथे १ जून रोजी वनविभागाने छापा टाकून मांडूळ बाळगल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले होते, वनविभागाच्या वतीने या वन्यजीव तस्करी करणारी टोळीचा सहभाग असल्याचे समोर आल्यावर पुढील तपासात एकुण १९ जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मांडूळ, कासव आदी वन्यजीव जप्त केले होते, या संशयितांमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचाही सहभाग असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती, येवला वनविभागाने १९ संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संशयितांपैकी प्रथम ताब्यात घेतलेल्या ९ जणांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, शुक्रवारी(दि. १९) रोजी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला असून उर्वरित दहा जणांच्या जामीन अर्जावर शनिवारी (दि.२०) सुनावणी होणार असल्याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली.