घरताज्या घडामोडीराज ठाकरे निघाले दौऱ्यावर ! मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह अयोध्येचा दौरा करणार -...

राज ठाकरे निघाले दौऱ्यावर ! मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह अयोध्येचा दौरा करणार – बाळा नांदगावकर

Subscribe

६ तारखेला राज ठाकरे पुणे दैऱ्यावर

राज ठाकरेंच्या नव्या निवासस्थानी मनसेची बैठक पार पडली. या बैठकीनंतर नगरपंचायत, नगरपरिषद, महापालिका, नगरपालिका किंवा इतर निवडणुकींबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत महाराष्ट्र दौऱ्या विषयी चर्चा करण्यात आली. त्याप्रमाणे आता ६ तारखेला राज ठाकरे पुणे दैऱ्यावर असणार आहेत. त्यानंतर १४ डिसेंबर रोजी राज ठाकरे यांचा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा हा सर्वच पदाधिकाऱ्यांसोबत असणार आहे. या संभाजीनगर, औंरंगाबाद या ठिकाणी सकाळी १० वाजता बैठक ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर या बैठकीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाईल. असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

मनसेची बैठक पार पडल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यानंतर ते म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले माजी आणि आजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसोबत १६ डिसेंबरला एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. एकूण ६ प्रदेशांमध्ये राज ठाकरे यांच्या बैठका होणार आहेत. परंतु आता २ बैठकांच्या तारखा ठरवण्यात आलेल्या आहेत.

- Advertisement -

अयोध्येला कधी जाणार ?

पुढची एक बैठक कोकणातली आहे. त्या बैठकीनंतर पुढील पाऊल ठरवलं जाणार आहे. आता मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच पुण्यात, कोकण या ठिकाणी बैठक घेण्याचं ठरवलं जाणार आहे. त्यामुळे एकूण १० दिवसांचा राज ठाकरे यांचा दौरा असणार आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येला कधी जाणार याची तारीख सुद्धा निश्चित करण्यात आलेली आहे. परंतु या दौऱ्यानंतर ती तारीख ठवण्यात येणार आहे. मुख्यत्वे ६ प्रदेशांमध्ये या महत्त्वाच्या बैठका पार पडणार असून नागपूर आणि अमरावतीमध्ये सुद्दा बैठका घेण्यात येणार आहेत.

परमबीर सिंग यांचं निलंबन

हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित्याखाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता तो निर्णय घेतलेला आहे. एक कोटीचा बॉन्ड घेण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला होता. त्यावेळी त्यांनी ठाण्यातील सभेत सुद्दा त्यांनी सांगितलं होतं की, आज तुम्ही १ कोटीचा बॉन्ड घेत आहात. उद्या तुम्हालाही द्यावे लागतील. करावं लागले आणि भोगावंही लागेल. त्यानंतर आता हे निलंबनाच्या दृष्टीने समोर आलेलं आहे. असं बाळा नांदगावकर म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान, आतापर्यंतची आम्ही निवडणुक एकला चलो रे या मार्गाने लढल्या आहोत. परंतु पुढे युती होईल की नाही. ते आता आम्ही सांगू शकत नाही. मात्र, आमची भूमिका एकटा जीव सदाशिव अशी असणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे पक्ष बांधणी संदर्भात हा दौरा महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जात आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -