घरमहाराष्ट्रशिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र विधिमंडळात, उद्धव ठाकरेंना 942 दिवसांत जे जमले नाही ते एकनाथ...

शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र विधिमंडळात, उद्धव ठाकरेंना 942 दिवसांत जे जमले नाही ते एकनाथ शिंदेनी 57 दिवसांत करून दाखवले

Subscribe

मुंबई : शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधिमंडळात लावण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली विनंती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्य केली आहे. सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या 57 दिवसांत मुख्यमंत्री शिंदे यांनी ही मंजुरी मिळवली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी, विशेषत: हिंदुत्वाशी फारकत घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी ‘उठाव’ केला. त्यामुळे पक्षातच दोन गट पडले. शिंदे गटाला अन्य 10 आमदारांनी साथ दिली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अल्पमततात आले. त्यानंतर 30 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी एका पाठोपाठ एक निर्णयांचा धडाकाच लावला.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी जवळपास 31 महिने मुख्यमंत्रीपद भूषविले. वर्षाच्या 365 दिवस असतात. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 940-45 दिवस मुख्यमंत्रीपद भूषविले. पण ते विधिमंडळात बाळासाहेबांचे चित्र लावण्याचा निर्णय घेऊ शकले नाहीत. पण बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आपल्याकडे असल्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र अवघ्या 57 दिवसांत विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय घेतला. त्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिरवा कंदीलही दाखवला आहे.

यासंदर्भात विधिमंडळ सचिवालय पुढील तीन महिन्यांत कार्यवाही करून विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात तैलचित्र लावेल, अशी घोषणा विधानसभाध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी केली. तसे निर्देशही त्यांनी संबंधिताना दिले.

- Advertisement -

संसदेतही चित्रासाठी प्रयत्न
महाराष्ट्र सदनात बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा बसवण्यात आला पाहिजे. तसेच नव्या संसदेच्या इमारतीतही बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावले पाहिजे, अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटातील सर्व खासदारांनी केली आहे. त्याअनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करणार आहेत.

प्रतीक्षा आता बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाची
राज्य सरकारने 2018मध्ये महापौरांच्या बंगल्याचे ‘बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारका’मध्ये रूपांतर करण्यास मंजुरी दिली आणि बंगल्याच्या जागेचे आरक्षण बदलण्यात आले. 31 मार्च 2021मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या या राष्ट्रीय स्मारकाचा भूमिपूजन सोहळा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला होता. मुंबईतील वास्तुविशारद आभा लांबा यांनी याचा आराखडा तयार केला असून या स्मारक योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची प्रकल्प समन्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्ती केली आहे. या स्मारकाचे काम एकूण दोन टप्प्यांत पूर्ण केले जाणार असून या वास्तू उभारणीचा पहिला टप्पा भूमीपूजनानंतर 14 महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -