घरताज्या घडामोडीकाँग्रेस पक्ष देशात पुन्हा जोरदार कमबॅक करेल - बाळासाहेब थोरात

काँग्रेस पक्ष देशात पुन्हा जोरदार कमबॅक करेल – बाळासाहेब थोरात

Subscribe

काँग्रेस हा एक विचार असून अनेक संकटातून हा पक्ष पुढे आला आहे. इंदिराजी गांधींच्या काळातही पक्षाला संघर्ष करावा लागला मात्र पुन्हा काँग्रेस पक्षाने भरारी घेतली.

शिर्डी-कोपरगाव रोडवरील साईसृष्टी लॉन्स येथे उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा व डिजिटल आढावा बैठक पार पडली. यावेळी बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्ष देशात जोरदार कमबॅक करेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, आगामी नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनिशी काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी काम करा. काँग्रेस पक्ष संघटन वाढवणे अत्यंत गरजेचे असून गोरगरीब माणूस ही खरी काँग्रेसची ताकद आहे त्याला सोबत घ्या. येणाऱ्या काळामध्ये सोनियाजी गांधी व राहुलगांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशात जोरदार कमबॅक करेल.

थोरात पुढे म्हणाले,  जाती धर्माच्या नावावर मते मागून सत्तेवर आलेले भाजपा सरकार हे राज्यात अस्थिरता निर्माण करू पाहत आहे. महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. अनेक संकटामध्ये जनतेच्या पाठीशी उभे राहिले. सोनियाजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने देशातील प्रत्येक नागरिकाला रोजगाराचा कायदा, अन्नसुरक्षा कायदा, आरोग्य कायदा, शिक्षणाचा कायदा हे महत्त्वाचे कायदे दिले. काँग्रेस हा एक विचार असून अनेक संकटातून हा पक्ष पुढे आला आहे. इंदिराजी गांधींच्या काळातही पक्षाला संघर्ष करावा लागला मात्र पुन्हा काँग्रेस पक्षाने भरारी घेतली.

- Advertisement -

स्वातंत्र्यप्राप्तीसह मागील सत्तर वर्षात काँग्रेस पक्षाने राबवलेल्या विविध योजनांमुळे देश समृद्ध झाला आहे. मात्र सात वर्षापूर्वी सत्तेवर आलेला भाजपा हा सातत्याने खोटे बोलून देशवासियांची दिशाभूल करत आहे. जाती-धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांपासून देशाला वाचवण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन प्रभारी एच. के. पाटील यांनी केले.

शिर्डी-कोपरगाव रोडवरील साईसृष्टी लॉन्स येथे उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा व डिजिटल आढावा बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी बी. एम. संदीप, विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार हिरामण खोसकर, आमदार शिरीष दादा चौधरी, माजी मंत्री पद्माकर वळवी, डॉ. शोभाताई बच्छाव, मा. खा. उल्हास पाटील, शरद आहेर, हेमलता पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, नाशिकचे डॉ. तुषार शेवाळे, शरद आहेर, धुळे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, संदीप भैय्यासाहेब पाटील, नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कीर्ती वळवी, अनुराधाताई नागवडे, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश उपाध्यक्ष भा.ई. नगराळे, राहुल साळवे, किरण काळे, मा. आ. अनिल आहेर, दुर्गाताई तांबे यांच्यासह अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा –  छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांनी माफी मागावी, नाना पटोलेंची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -