घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशेतकऱ्यांच्या समस्यांसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांची "बळीराजा हेल्पलाईन"

शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांची “बळीराजा हेल्पलाईन”

Subscribe

नाशिक : जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. पोलिसांनी शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरु केली आहे. शेतकर्‍यांना विनाप्रवास घरबसल्या ६२६२ ७६ ६३६३ या बळीराजा हेल्पलाईनवर कॉल करताच पोलिसांची मदत मिळणार आहे. या हेल्पलाईनचा शुभारंभा सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सोमवारी (दि.१४) करण्यात आला.

अवैध व्यवसायाविरोधात कारवाई करणे सुलभ व्हावे, या दृष्टीकोनातून नाशिक ग्रामीण पोलिसांनी ६२६२ २५ ६३६३ ही ‘खबर’ हेल्पलाईन सुरू केली होती. या हेल्पलाईनचे माध्यमातून अनेक नागरिकांनी अवैध व्यवसायांची माहिती पोलीसांना दिली. त्यामुळे पोलीसांना अवैध व्यवसायांविरुद्ध कारवाई करण्यासाठी मदत झाली. जिल्ह्यातील शेतकरीबांधवांना अनेक कामांसाठी पोलीस ठाण्यात व इतर कार्यालयामध्ये जावे लागते. बर्‍याचदा आपले काम नक्की कोणाकडे प्रलंबित आहे, याची माहिती देखील शेतकर्‍यांना मिळत नाही.

- Advertisement -

परिणामी, त्यांना अकारण प्रवास खर्च सोसावा लागतो व त्यांचा वेळ देखील खर्च होतो. ही बाब लक्षात घेऊन ग्रामीण पोलिसांनी शेतकर्‍यांसाठी आता ६२६२ ७६ ६३६३ ही नवीन ‘बळीराजा’ हेल्पलाईन सुरू केली आहे. याप्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार कांगणे आदी उपस्थित होते.

पहिला कॉल पालकमंत्र्यांचा

बळीराजा हेल्पलाईनवर पहिला कॉल करून ते शेतकरी बोलत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेली ही हेल्पलाईन जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या समस्या सोडवणुकीसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी भावना पालकमंत्री भुसे यांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.

- Advertisement -

पोलिसांचे आवाहन

ग्रामीण पोलीस दल शेतकर्‍यांच्या समस्या सोडवणुकीसाठी कटिबद्ध आहे. शेतकर्‍यांनी तक्रारी हेल्पलाईनवर द्याव्यात, असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -