घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टराणेंच्या अस्तित्वाची लढाई!

राणेंच्या अस्तित्वाची लढाई!

Subscribe

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश राणे यांच्यासाठी ही अटीतटीची लढाई आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ. बॅरिस्टर नाथ पै, मुधू दंडवते या दिग्गजांचा मतदारसंघ म्हणून या मतदार संघाची खरी ओळख होती. मात्र यंदा या लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचे विशेष लक्ष आहे. त्याचे कारण म्हणजे या मतदारसंघात निवडणुकीत पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना समोरासमोर उभे ठाकले आहेत. शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत आणि नारायण राणे यांचे चिरंजीव महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांच्यातील कलगीतुरा आता खर्‍या अर्थाने रंगणार आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा पराभव करत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी शिवसेनेचा हा बालेकिल्ला शाबूत ठेवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत देखील त्यांच्या समोर गड कायम राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. तर निलेश राणे यांच्यासमोर 2014 च्या पराभवाचा वचपा काढण्याचे आव्हान असणार आहे. 2014 च्या निवडणुकीत निलेश राणे हे काँग्रेसच्या तिकिटावर खासदारकी लढले होते. मात्र ही निवडणूक ते स्वतःच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातून लढणार आहेत. त्या

- Advertisement -

मुळे त्यांचा कस लागणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या या मतदार संघात पाच शिवसेनेचे, तर एक काँग्रेसचा आमदार आहे. त्यामुळे निलेश राणे यांच्यासमोर जरी आव्हान कठीण वाटत असले तरी ते विनायक राऊत यांना ही निवडणूक सोपी नाही.

भाजपच्या स्थानिक नेत्यांचा राऊतांना विरोध

भाजपच्या कोकणातील स्थानिक नेत्यांनी विनायक राऊत यांना विरोध केला असून, जर या स्थानिक नेत्यांनी छुप्या पद्धतीने नारायण राणे यांच्याशी हात मिळवणी केली तर विनायक राऊत यांची डोकेदुखी वाढण्याची शकते. तर राष्ट्रवादी काँग्रेस देखील नारायण राणे यांना मदत करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मागील मतदानाची टक्केवारी

या मतदारसंघात 2009 च्या लोकसभा निवडणुकीत 57.40 टक्के तर 2014 ला 65.86 टक्के मतदान झाले होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे 2014 मध्ये शिवसेना खासदार विनायक राऊत यांना 4 लाख 93 हजार 88 मते पडली. तर काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या निलेश राणे यांना 3 लाख 43 हजार 37 मते मिळाली. तब्बल दीड लाखांहून अधिकच्या मतांनी विनायक राऊत निवडून आले होते.

काय असतील प्रचाराचे मुख्य मुद्दे

– नाणार रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाली त्याचे श्रेय घेण्याचा पुरेपूर प्रयत्न

– जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्पालाही मच्छीमार आणि स्थानिकांचा असलेला विरोध

– मुंबई- गोवा महामार्गाचे चौपदरीकरण तसेच कोकण रेल्वेचे दुपदरीकरण

– बंदरांचा विकास

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -