घरताज्या घडामोडीऔरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण!

औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण!

Subscribe

औरंगाबादमधील एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना हात उचलला आहे. रुग्ण दगावल्यामुळे नातोकाईकांकडून डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच नातेवाईकांकडून आयसीयूची तोडफोड देखील केली आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली आहे.

काय घडले नेमके?

औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात या रुग्ण आर्थोचे उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याची प्रकृती पाहून त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे म्हणणे होते. त्यामुळे तेव्हाच त्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. काही वेळात त्याची प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णाला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र आयसीयूमध्ये दाखल करताच रात्री साडे दहाच्या दरम्यान दुर्दैवाने त्या रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त करत डॉक्टरांवर हात उचलला. रुग्णालयाची तोडफोड देखील केली आहे. या प्रकरणी एमजीएम रुग्णालयाने सिडको पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. कोरोनाचे उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण रुग्णाचे नातेवाईक इतके का संतापले? तसेच रुग्णालयात नेमकी काय स्थिती निर्माण झाली होती? हे मात्र अद्याप कळू शकले नाही. पण बुधवारी रात्री औरंगाबादमधील एमजीएम रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Corona: लाखांहून अधिक बाधितांमध्ये कोरोनाची लक्षणेच नाहीत!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -