घरमहाराष्ट्रबीड स्त्रीभ्रूण हत्या प्रकरण: डॉ. सुदाम मुंडे दाम्पत्याला १० वर्षांची सक्तमजुरी

बीड स्त्रीभ्रूण हत्या प्रकरण: डॉ. सुदाम मुंडे दाम्पत्याला १० वर्षांची सक्तमजुरी

Subscribe

बीड जिल्ह्यातील परळी येथील स्त्री भ्रूण हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी डॉ. सुदाम मुंडे, पत्नी सरस्वती मुंडे आणि मृत महिलेचा पती महादेव पटेकर यांना आज बीड जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांना दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्याकडे संबंध राज्याचे लक्ष लागले होते. या तिन्ही आरोपींवर भादंविच्या कलम ३१२, ३१४, ३१५ आणि ६ पीसीपीएनडीटी या कायद्यानुसार या तिघांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणात एकूण १७ आरोपी होते, त्यापैकी जळगावच्या डॉक्टर राहुल कोल्हे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे १६ आरोपींसंदर्भात आजचा निकाल आलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -