घरमहाराष्ट्रजनसंवादात ‘सोशल मीडिया’ची भूमिका महत्त्वाची - भंडारी

जनसंवादात ‘सोशल मीडिया’ची भूमिका महत्त्वाची – भंडारी

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत वेगाने संप्रेशित होत आहेत. या जनसंवादात ‘सोशल मिडीया’ची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष महावीर भंडारी यांनी केले.

सध्या कॉंग्रेसची महाराष्ट्रभरात जनसंघर्ष यात्रा सुरु आहे. या संघर्षयात्रेत मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. २०१९ लोकसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर ही जनसंघर्ष यात्रा महत्त्वाची आहे. या यात्रेची घडानघडा माहिती सोशल मीडियाच्या मार्फत राज्यात पोहोचत आहे. सध्या सोशल मीडिया हे लोकांपर्यत पोहोचण्याचे फार महत्त्वाचे आणि सोपे माध्यम आहे. ते सहज आणि सोपे असल्यामुळे कोट्यवधी लोक सोशल मीडियावर आहेत. या लोकांनापर्यंत आपले काम पोहोचावे यासाठी राजकारणी लोकांसाठी सोशल मीडिया हे चांगले माध्यम आहे. या माध्यामाचा वापर आता प्रचारासाठी देखील केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महावीर भंडारींची राकाँ सोशल मिडीया सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येय-धोरणे सर्वसामान्यांपर्यंत वेगाने संप्रेशित होत आहेत. या जनसंवादात ‘सोशल मिडीया’ची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष महावीर भंडारी यांनी केले. भंडारींची राकाँ सोशल मिडीया सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला उत्तर देताना भंडारी बोलत होते. यावेळी भंडारी यांचे सोशल मिडीयाच्या माध्यमातून चालू असलेल्या कामाचे वळसे पाटील यांनी कौतुक केले.सोशल मिडीया हे प्रभावी माध्यम बनले असून, पक्षाची ध्येय धोरणे नागरिकांपर्यंत पोहचत आहे. यावेळी भंडारी म्हणाले की, नागरिकांच्या देखील अपेक्षा यातून कळतात.या सेलचे उपाध्यक्ष म्हणून ३ वर्षे काम पाहिले असताना जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाली असल्याचे महावीर भंडारी यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -