मी मंत्री होणारच – भरत गोगावले

We will not return until the operation is completed,

स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृत महोत्सवानिमित्त महाड तालुक्यातील वहूर गावात बांधलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन महाड-पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात गोगावले यांनी ५ गावांसाठी नवीन नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून लवकरच काम सुरू होईल, असे सांगत आपण मंत्री होणारच असा पुनरुचार भरत गोगावले यांनी केला.

शनिवारी महाड तालुक्यातील वहूर गावात नवीन बांधण्यात आलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या भव्य इमारतीचे उद्घाटन महाड-पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. ही इमारत जिल्हा ग्रामविकास निधीतून २६ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आली. अद्याप इमारतीचे छप्पर अर्धवट अवस्थेत असतानाच पुढील कामासाठी लागणारा निधी देण्यात येईल आणि काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी गोगावले यांनी दिले. जल जीवन मिशनमधून महाड तालुक्यातीळ वहूर, दासगावसाठी १४ कोटी, दाभोळ, टोळ गावासाठी १२ कोटी, वीरगावासाठी ३.५० कोटी अशी २८ कोटींची नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.

तीन वेळा आमदार झालेल्या गोगावाले यांना भाजप-सेना युतीत आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती, मात्र त्यांना मंत्रीपद दिले नाही. त्यातच आता बंडखोरीनंतर तरी मंत्रीपद मिळेल, अशी चर्चा होती. प्रत्येक वेळी गोगावले यांनी वारंवार आपल्याला मंत्रीपद मिळणार, असे सांगितले होते. आताही त्यांनी आपण मंत्री होणार असा पुनरुच्चार केला आहे.